Nepal Earthquake: मंगळवारी सकाळी देशातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र नेपाळ-तिबेट सीमा असल्याचे सांगितले जात आहे. नेपाळसह तीन देशांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी होती. हा भूकंपाचा प्रभाव बिहार, सिक्कीम, आसाम आणि उत्तर बंगालसह भारतातील काही भागात जाणवला. तिबेटमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या उत्तर-पश्चिम 84 किमी अंतरावर लोबुचे होते. सुमारे 10 किमी खोलीवर त्याची नोंद झाली. बिहारमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी मोजण्यात आली. सोशल मीडियावर भूकंपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये जमीन हादरताना दिसत आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा: Israel Gaza War: इस्रायलचे गाझा पट्टीवर 3 दिवसांत 94 हवाई हल्ले; हवाई हल्ले आणि गोळीबारात 184 लोक मारले गेल्याचा दावा)

नेपाळमध्ये पहाटे 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)