LPG Cylinder | (File Image)

LPG Connections in India: देशातील घरगुती एलपीजी कनेक्शनची संख्या गेल्या 10 वर्षांत दुपटीने वाढून 32.83 कोटी झाली आहे. जी 2014 मध्ये 14.52 कोटी होती ती आता 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत 32.83 कोटी झाली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने अधिकृत अहवालात म्हटले आहे की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत, गरीब कुटुंबांना अनुदानित किमतीत स्वयंपाकाचा गॅस देण्यासाठी 10.33 कोटी एलपीजी कनेक्शन जारी केले आहेत. योजना सुरू झाल्यापासून, अंदाजे 222 कोटी एलपीजी देण्यात आले आहेत. दररोज अंदाजे 13 लाख एलपीजी घेतले जात आहेत. (Nylon Kite String Slashes Throat: नायलॉन मांजाने कापला गळा, दुचाकीस्वाराचा मृत्यू; मेरठ येथील घटना)

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदान दिले जात आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे उज्ज्वला कुटुंबांचा एलपीजीचा वापर वाढला आहे. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरचा दरडोई वापर 2019-20 मध्ये 3.01 वरून 2023-24 मध्ये 3.95 पर्यंत वाढला आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत वापर 4.34 पर्यंत वाढला. अहवालात पुढे म्हटले आहे की, 2014 पासून, 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत एलपीजी वितरकांची संख्या 13,896 वरून 25,532 पर्यंत वाढली आहे. ज्यामुळे एलपीजीची उपलब्धता वाढली आहे. 90 टक्क्यांहून अधिक नवीन वितरक ग्रामीण भागात सेवा देत आहेत.

याशिवाय, गेल्या 10 वर्षांत देशातील नैसर्गिक वायू पाइपलाइन नेटवर्कमध्ये मोठा विस्तार झाला आहे. 2014 मध्ये 15,340 किलोमीटर होती. जी 2024 मध्ये 24,945 किलोमीटर झाली आहे. याशिवाय 10,805 किमी नैसर्गिक वायू पाइपलाइनचे बांधकाम सुरू आहे. या पाइपलाइन पूर्ण केल्याने राष्ट्रीय गॅस ग्रीड पूर्ण होईल. ज्यामुळे भारतातील सर्व ठिकाणाची मागणी आणि पुरवठा केंद्रे जोडली जातील. सर्व प्रदेशांमध्ये नैसर्गिक वायूची सहज उपलब्धता सुनिश्चित होईल.