Water Music: शाळेत असताना डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक किंवा आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आपण सर्वांनी पाहिले होते. पण एका विद्यार्थीनीने वॉटर म्युझिकसारख्या अनोख्या गोष्टीची पदवी घेतील आहे, याची कल्पना कोणी केली होती का? होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे! नुकताच एका महिलेचा स्टेजवर वॉटर म्युझिक सादर करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओने अनेकांचे, विशेषत: विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले, जे या असामान्य पदवीबद्दल ऐकून आश्चर्यचकित झाले. ध्वनी आणि पाणी यांची सांगड घालणारे वॉटर म्युझिक हे अभिनव क्षेत्र आता करिअरचा एक रोमांचक पर्याय बनत आहे. या व्हिडिओमुळे शिक्षणातील या नव्या, अपारंपरिक मार्गाबद्दल उत्सुकता आणि चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल वॉटर म्युझिक व्हिडिओ काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आणि आतापर्यंत 12.9 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक महिला विविध वाद्यांसोबत वॉटर म्युझिक सादर करताना दिसत आहे, तर एक बँड स्टेजवर म्युझिकल सपोर्ट करत आहे. ही अनोखी कला सादर करताना समोर बसलेले प्रेक्षक त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात.

येथे पाहा, महिलेचा व्हिडिओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)