उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) हरदोई (Hardoi Woman Elopes) जिल्ह्यातील एका विचित्र घटनेत, एका 36 वर्षीय महिलेने भिकाऱ्यासोबत पळून (Woman Elopes with Beggar) जाण्यासाठी तिचा पती आणि सहा मुलांना सोडून दिल्याचा आरोप आहे. राजू नावाच्या पतीने भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 87 अंतर्गत (Section 87 BNS) अपहरणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पत्नी राजेश्वरी आणि त्यांच्या सहा मुलांसह हरदोईच्या हरपालपूर भागात राहणाऱ्या 45 वर्षीय राजूने सांगितले की, 45 वर्षीय नन्हे पंडित नावाचा भिकारी त्यांच्या परिसरात वारंवार येत असे. राजूच्या दाव्याननुसार, पंडित अनेकदा राजेश्वरीशी गप्पा मारत असत आणि दोघे फोनवर संपर्कात असत.
काय आहे तक्रार?
राजूने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास माझी पत्नी राजेश्वरीने आमची मुलगी खुशबूला सांगितले की ती कपडे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहे. ती परत आली नाही तेव्हा मी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. म्हैस विकून मी कमावलेले पैसे घेऊन ती घरातून निघून गेली. मला शंका आहे की, भिकारी नन्हे पंडित तिला आपल्याबरोबर घेऊन गेले आहेत. (हेही वाचा, Madhya Pradesh: भोपाळमध्ये अपंगत्वाचा बनाव करणाऱ्या भिकाऱ्याला वृद्धाने वाइपरने मारले, व्हिडिओ व्हायरल)
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 87 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे आणि आरोपी नन्हे पंडित याचा सक्रियपणे शोध घेत आहेत. भारतीय न्याय संहिताचे कलम 87 महिलांचा समावेश असलेल्या अपहरणाच्या प्रकरणांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करते.
बीएनएसचे कलम 87 काय सांगते?
हे कलम सांगते की, "जो कोणी कोणत्याही स्त्रीचे तिला बळजबरी करावी या हेतूने अपहरण करतो किंवा तिचे अपहरण करतो, किंवा तिला तिच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता आहे हे जाणून, किंवा तिला जबरदस्तीने किंवा बेकायदेशीर संभोगासाठी फसवण्यासाठी, तिला दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाईल". जबरदस्तीने किंवा धमक्या देऊन एखाद्या महिलेला जागा सोडण्यास प्रवृत्त केल्याबद्दल, त्याच प्रकारच्या दंडासह शिक्षा पुढे निर्दिष्ट केली आहे.
स्थानिकांना धक्का
एखाद्या व्यक्तीची बायको भिकाऱ्यासोबत पळून जाणे ही घटना असामान्य मानली जात आहे. ज्यामुळे हरदोईमधील स्थानिकांना धक्का बसला आहे आणि कुतूहलही निर्माण झाले आहे. पोलिसांनी पीडिताचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांशी बोलताना म्हटले की, आम्हस तक्रा प्राप्त झाली आहे. आम्ही गुन्हाही दाखल केला आहे. आम्ही लवकरच बेपत्ता व्यक्तीचा शोध घेऊ आणि घटनेतील सत्यता पडताळून पाहू. दोषी व्यक्तीस अटक करुन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करु.