Salman Khan (फोटो सौजन्य - फेसबुक)

Salman Khan Death Threat: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये (Galaxy Apartment) काही दिवसांपासून नूतनीकरणाचे काम सुरू होते. आता अपार्टमेंटचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याची बाल्कनी आणि खिडक्या बुलेटप्रूफ काचेने दिसत आहेत. एनडीटीव्हीने जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, सलमानची (Salman Khan)सुरक्षा यंत्रणा हायटेक करण्यात आली आहे आणि घराभोवती हाय रिझोल्यूशनचे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर 1BHK मध्ये राहतो, तर त्याचे आई-वडील पहिल्या मजल्यावर राहतात. या बाल्कनीतून सलमान खान त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येतो. (Salman khan Death Threat: सलमान खानला पुन्हा धमकी, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवला संदेश)

14 एप्रिल रोजी गोळीबार

8 महिन्यांपूर्वी 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 4 राउंड फायर करण्यात आले होते. ज्यांनी गोळीबार केला ते घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सलमानची बाल्कनी आहेत त्याच भिंतीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. जिथे तो त्याच्या चाहत्यांना भेटायला येतो. नंतर या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स ग्रुपने घेतली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीस्वार घटनास्थळावरून दोघे पळताना दिसले.

सलमानचे जवळचे असलेले बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली होती. सलमान खानचे सर्वात जवळचे मित्र आणि एनसीपी नेता होते बाबा सिद्दीकी. या घटनेची जबाबदारीही लॉरेन्स गँगने घेतली होती. तेव्हापासून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तेव्हापासून सलमानच्या घराबाहेर किंवा जवळ कोणतेही वाहन थांबू दिले जात नाही. सलमानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर वाय प्लस सुरक्षेत आणखी एक थर वाढवण्यात आला आहे.