Helmet | Pixabay.com

पुण्यामध्ये (Pune) अपघातांचं प्रमाण पाहता आता आरटीओ कडून त्यांना रोखण्यासाठी नवे नियमावली राबवण्यास सुरूवात झाली आहे. आता पुणे आरटीओ (Pune RTO) च्या नव्या नियमावलीनुसार, दुचाकी विकणार्‍या दुकानदारांना त्यांच्या ग्राहकांना डिलेव्हरीच्या वेळेस 2 हेल्मेट्स द्यावी लागणार आहेत. मागील काही महिन्यांत दुचाकीस्वारांच्या अपघातांचे आणि त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली होती परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आता पुणे आरटीओ कडून नवे प्रयत्न सुरू झाले आहेत. रस्ते प्रवास सुरक्षेच्या दृष्टीने आता पुणे आरटीओ ने नियमांत बदल केले आहेत. त्याबाबतची अधिकृत नोटीस मोटारसायकल डीलरशीप्सना देण्यात आली आहे. यामध्ये हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रत्येक नव्या मोटारसायकलच्या विक्री वेळेस हेल्मेट्स देखील द्यावी लागणार आहेत.

हेल्मेट सक्ती पुण्यात कडक होणार

अपघात कमी करण्याच्या दृष्टीने पुणे ट्राफिक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती कठोर केली जाणार आहे. हेल्मेट न घालता प्रवास करणार्‍यांना रोखण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेर्‍यामधून लक्ष ठेवले जाणार आहे. नव्या नियमांच्या खाली आता अधिक कठोर पणे लक्ष ठेवले जाणार आहे. नक्की वाचा: दुचाकी चालक आणि चालकामागे बसणार्‍याला हेल्मेट न घालणं आता पडणार महागात; महाराष्ट्र पोलिसांकडून नियमाच्या कडकपणे अंमलबजावणीचे निर्देश, पुण्यातही विशेष मोहिम .

अधिकृत माहितीनुसार, पुण्यात 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर दरम्यान 271 अपघात झाले आहेत. या अपघातांत 278 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे हे आकडे चिंता वाढवणारे आहेत. मोटारसायकल चालकांच्या दृष्टीने कठोर नियमावलीची गरज यामधून निर्माण झाली आहे. Additional Director General of Police for Traffic, Arvind Salve यांनी दिलेल्या सूचनांमध्ये आता हेल्मेटसक्ती कठोर करण्याचेही निर्देश आहेत.