हिंदू धर्मीयांसाठी महाकुंभमेळा हा अतिशय श्रद्धेचा विषय आहे. दर 12 वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. महाकुंभमेळा 2025 हा यंदा उत्तर प्रदेश मधील प्रयागराज मध्ये होणार आहे. या कुंभमेळ्यात लाखो भाविक येणार आहे. सध्या त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी देखील सुरू आहे. भाविकांसोबतच साधु महंतांसाठी विशेष सोय केली जात आहे. यामध्ये सुरक्षा जपण्याचं मोठं आवाहन आहे. त्रिवेणी संगमावर या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने स्नान करण्याची पद्धत आहे.. गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर स्नान केल्याने पाप मुक्ती होऊन मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे यंदा या महाकुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या सहा तारखा कोणत्या? प्रयागराज मधील महाकुंभ मेळा कधी पासून कधी पर्यंत आहे? हे सारं इथे नक्की जाणून घ्या.
प्रयागराज मधील महाकुंभ मेळा 2025 कधी पर्यंत?
प्रयागराज मधील महाकुंभ मेळा 2025 ची सुरूवात जानेवारी 13, 2025 पासून होणार असून त्याची सांगता 26 फेब्रुवारी 2025 दिवशी होणार आहे. हा महाकुंभमेळा 45 दिवसांचा आहे. Mahakumbh Mela 2025: महाकुंभ मेळासाठी हवामान विभागाकडून विशेष वेबपेज लाँच; दर 15 मिनिटांनी कळणार वातावरणातील बदल .
महाकुंभमेळा 2025 मधील शाहीस्नानाचे दिवस कोणते?
पौष पौर्णिमा स्नान - 13 जानेवारी
मकर संक्रांती स्नान - 14 जानेवारी
मौनी अमावस्या स्नान - 29 जानेवारी
बसंत पंचमी स्नान - 3 फेब्रुवारी
माघी पौर्णीमा स्नान - 12 फेब्रुवारी
महाशिवरात्र स्नान - 26 फेब्रुवारी
महाकुंभमेळा हा प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक मध्ये भरतो. यामध्ये जेव्हा गुरू वृषभ राशीत आणि त्यावेळी सूर्य मकर राशीत असतो तेव्हा तो प्रयागराज मध्ये भरतो. हेच स्थान जेव्हा गुरू कुंभ आणि त्यावेळीच सूर्य मेष राशीत संक्रमण करतो तेव्हा हरिद्वार मध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन होते. गुरू आणि सूर्य सिंह राशीत असतो तेव्हा महाकुंभमेळा नाशिक मध्ये तर गुरू सिंह आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा महाकुंभमेळा उज्जैन मध्ये आयोजित केला जातो. Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यामध्ये सायबर फसवणुकीचा धोका; सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा यूपी पोलिसांचा हा सल्ला (Watch Video).
दरम्यान प्रयागराज हे तीर्थराज म्हणजेच तीर्थक्षेत्रांचा राजा असल्याचं भाविक मानतात. पुराणात तशी माहिती आहे. त्यामुळे या महाकुंभमेळ्याचे विशेष महत्त्व आहे. यंदा महाराष्ट्रातून प्रयागराजला जाण्यासाठी विशेष ट्रेन्सदेखील चालवल्या जाणार आहेत.