
Videos Of Women Bathing Maha Kumbh: सध्या प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभमेळ्यात (Maha Kumbh 2025) दररोज लाखो भाविक पवित्र स्नान करत आहेत. परंतु, काही नास्तिक लोक महाकुंभमेळ्यात देखील पापीकृत्य करत आहेत. या लोकांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली आहे. महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे गुप्त व्हिडिओ बनवून ते डार्क वेब (पोर्नोग्राफिक साइट) आणि इतर सोशल मीडियावर विकणाऱ्यांविरुद्ध प्रयागराज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात प्रयागराज पोलिसांनी 13 एफआयआर दाखल केले आहेत. तसेच, 103 सोशल मीडिया हँडलवर कारवाई करण्यात आली आहे.
103 सोशल मीडिया हँडलवर कारवाई -
प्रयागराज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट आणि टेलिग्राम चॅनेलवर असे व्हिडिओ आणि फोटो अपलोड केल्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी तपास केला तेव्हा असे आढळून आले की, सीसीटीव्ही चॅनल 11 नावाच्या टेलिग्राम चॅनलवर काही आक्षेपार्ह छायाचित्रे टीझर म्हणून वापरली जात होती. (हेही वाचा - Prayagraj Mahakumbh 2025: महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही; संगमातील Faecal Coliform बॅक्टेरियाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, CPCB अहवालातून समोर आली धक्कादायक बाब)
काही छायाचित्रे अपलोड करून असा दावा करण्यात आला होता की, या चॅनेलला 1999 रुपयांत सबस्क्राईब केल्यास महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ उपलब्ध करून दिले जातील. पोलिसांना अशीच अनेक खाती सापडली आहेत. पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या अकाउंट्सची सविस्तर माहिती मागवली आहे. या प्रकरणात यूपी पोलिसांनी 13 एफआयआर नोंदवले आहेत. तसेच असे व्हिडिओ अपलोड करणाऱ्या 103 सोशल मीडिया हँडलवर कारवाई करण्यात आली आहे. (हेही वाचा - Mamta Banerjee On Mahakumbh: 'महाकुंभ नाही हा तर मृत्यू कुंभ'; ममता बॅनर्जींचा योगी सरकारवर हल्लाबोल)
महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ अपलोड करून कमवले पैसे -
प्राप्त माहितीनुसार, FIR मध्ये टेलिग्राम अकाउंट, सीसीटीव्ही आणि चॅनल 11 चे नाव आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की महाकुंभमेळ्यात महिला स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर टेलिग्राम चॅनेलने यासाठी 1999 रुपयांचे सबस्क्रिप्शन देखील घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, डीआयजी वैभव कृष्णा यांनी सांगितले की, काही फोटो आणि व्हिडिओंवर असे लिहिले आहे की ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजेच याद्वारे पैसे कमविण्याचा व्यवसाय देखील सुरू आहे. त्यामुळे आता पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, प्रयागराजच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये @neha1224872024 या इन्स्टाग्राम अकाउंटविरुद्ध बीएनएस अॅक्टच्या कलम 79, 353 आणि आयटी अॅक्टच्या कलम 67 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.