Cybercrime | (Photo credit: archived, edited, representative image

प्रयागराज मध्ये होत असलेल्या यंदाच्या महाकुंभमेळ्याचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. महाकुंभमेळा 2025 साठी सारी तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. देशातून, परदेशातून लाखो श्रद्धाळू आता प्रयागराज मध्ये येणार आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्यामध्ये श्रद्धाळूंना सार्‍या सोयी सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी उत्तर प्रदेश पोलिस शॉर्ट फिल्म जारी करत आहे. यामागील उद्देश भाविकांची ऑनलाईन फसवणूक होऊ नये हा आहे. आजकाल सायबर फ्रॉड चे अनेक प्रकार समोर येत आहेत.

हॉटेल बूकिंग, किंवा अन्य कोणत्याही बुकिंगच्या नावाखाली भाविकांच्या खाजगी माहितीवर डल्ला मारला जाऊ शकतो. क्यू आर कोडच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहणं गरजेचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अधिकृत वेबसाईट्सच्या माध्यमातूनच बूकिंग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. http://Kumbh.gov.in वर भाविकांना सारी अधिकृत माहिती मिळणार आहे.  Jumped Deposit Scam म्हणजे काय? UPI Users या नव्या ऑनलाईन फ्रॉड पासून कसे सुरक्षित रहाल? 

सायबर फ्रॉड पासून सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?

  • महाकुंभ मध्ये येणार्‍या श्रद्धाळूंना बनावट ऑफर्स आणि डिस्काऊंट्सच्या आमिषापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेक ऑफर्स या लोकांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या असतील त्यामागे फसवणूक होत नसल्याचं पहा.
  • क्यूआर कोड स्कॅन करताना सतर्क रहा. कोणत्याही अज्ञात क्यूआर कोडला स्कॅन करू नका.
  • हॉटेल बूकिंग सह अन्य सेवांसाठी केवळ http://Kumbh.gov.in चा वापर करा.
  • सोशल मीडीया वरही कोणत्याही अज्ञात वेबसाईट वर, लिंक वर क्लिक करणं टाळा.

कधी आहे महाकुंभ मेळा?

महाकुंभ मेळा यंदा प्रयागराज मध्ये 13 जानेवारीला पौष पौर्णिमेदिवशी सुरू होत आहे. 26 फेब्रुवारीला पुन्हा शाही स्नानाने महाशिवरात्रीला त्याची सांगता होणार आहे. एकूण 45 दिवस चालणार्‍या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. गंगा, यमुना, सरस्वती च्या संगमावर स्नान केल्याने पाप नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होते अशी भाविकांची धारणा आहे.