
Terrorist Plot at Kumbh Mela Foiled: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यात (Kaushambi District) राज्य पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुरुवारी पहाटे बब्बर खालसा (Babbar Khalsa) इंटरनॅशनल (बीकेआय) च्या एका 'सक्रिय दहशतवाद्याला' अटक (Arrest) करण्यात आली. बब्बर खालसा हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी ( ISI) संबंध असल्याचा आरोप आहे. याबाबत, उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
महाकुंभ 2025 मध्ये अशांतता निर्माण करण्याची योजना -
डीजीपींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश पोलिस उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांविरुद्ध शून्य सहनशीलतेने काम करत आहेत. महाकुंभ 2025 च्या यशस्वी आयोजनानंतर, एसटीएफ आणि एटीएस सतत काम करत आहेत. गुप्तचर विभागाला अशी माहिती मिळाली होती की विध्वंसक घटक अशांततेच्या घटना घडवू शकतात. त्या अनुषंगाने, काल रात्री ATS ने एक महत्त्वाचे यश मिळवले आहे. एटीएस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाईत ही कारवाई केली. बब्बर खालसा ग्रुपचा दहशतवादी गजर मसीह याला कौशांबी येथून अटक करण्यात आली. (हेही वाचा -Ayodhya Ram Mandir Terror Plot Foiled: अयोध्येतील राम मंदिर दहशतवादी कट उधळला; संशयिताला अटक)
महाकुंभमेळ्यादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी -
आरोपींकडून 3 हँडग्रेनेड, 2 डेटोनेटर्स, जिवंत काडतुसे, सॅमसंग मोबाईल आणि बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले. यापूर्वी, विविध एजन्सी आणि पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 3 दहशतवादी मारले गेले होते. त्यांनी सांगितले की, खलिस्तानी दहशतवादी पन्नू अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहत होता. महाकुंभमेळ्यादरम्यान त्याने दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली होती. आम्ही विशेष दलांना सतर्क ठेवले होते. कोणतीही अनुचित घटना टाळता यावी म्हणून आमचे पथक सतत सतर्क होते. (हेही वाचा - Man Arrested in Ayodhya Ram Mandir for wearing 'Glasses': अयोध्या राम मंदिर मध्ये तरूणाला अटक; चष्म्यातील खास कॅमेर्यातून टिपत होता फोटो)
#WATCH | Lucknow: An active terrorist of Babbar Khalsa International (BKI) and ISI module, Lajar Masih arrested in a joint operation of UP STF and Punjab Police | UP DGP Prashant Kumar says, " Under the leadership of CM, there is zero tolerance for crime...a successful joint… pic.twitter.com/S51maaEXyx
— ANI (@ANI) March 6, 2025
एसटीएफचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक लाल प्रताप आणि पंजाबच्या पथकाला दहशतवाद्याच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. दहशतवाद्याने गाझियाबाद येथून बनावट पत्त्यावर आधार कार्ड बनवले होते. महाकुंभात कोणतीही घटना घडल्यानंतर तो परदेशात पळून जाऊ शकेल यासाठी त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. परंतु, कुंभ सुरक्षा संस्थांच्या सतर्कतेमुळे तो त्याच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकला नाही. तो आयएसआयच्या संपर्कात होता, पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होता.