
PM Modi On Mahakumbh: प्रयागराज महाकुंभाच्या (Mahakumbh 2025) समारोपाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाकुंभ संपला असून 'एकतेचा महान यज्ञ' पूर्ण झाला आहे. या कार्यक्रमाला ऐतिहासिक यश मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे काम करणाऱ्या 140 कोटी भारतीयांच्या समर्पणाबद्दल आणि सहभागाबद्दल त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी 45 दिवसांच्या महाकुंभाचे वर्णन भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतिबिंब म्हणून केले. तसेच देशभरातील लोक श्रद्धेने आणि भक्तीने महाकुंभात कसे एकत्र आले यावर प्रकाश टाकला.
महाकुंभमेळ्यावर पंतप्रधान मोदींचे चिंतन -
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, 'महाकुंभ संपला आहे. एकतेचा भव्य उत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. प्रयागराजमध्ये 45 दिवस या पवित्र कार्यक्रमाशी 140 कोटी भारतीयांची श्रद्धा ज्या प्रकारे जोडली गेली ती खरोखरच भारी आहे! महाकुंभाच्या समारोपाच्या वेळी मी माझ्या भावना शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाने "एक भारत, श्रेष्ठ भारत" च्या दृष्टिकोन दाखवून दिला. या महाकुंभात समाजाच्या प्रत्येक घटकातील लोक एकत्र आले. एकतेचे हे अविस्मरणीय दृश्य कोट्यवधी भारतीयांसाठी आत्मविश्वासाचा उत्सव बनले. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी लोकांचे प्रयत्न, समर्पण आणि दृढनिश्चय पाहून मी खूप प्रभावित झालो आहे.' (हेही वाचा -Nashik Kumbh Mela 2027 Dates: प्रयागराज महाकुंभानंतर नाशिक येथे 2027 मध्ये होणार पुढील कुंभमेळा; महाराष्ट्र सरकारने सुरु केली तयारी, जाणून घ्या तारखा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट -
महाकुंभ संपन्न हुआ...एकता का महायज्ञ संपन्न हुआ। प्रयागराज में एकता के महाकुंभ में पूरे 45 दिनों तक जिस प्रकार 140 करोड़ देशवासियों की आस्था एक साथ, एक समय में इस एक पर्व से आकर जुड़ी, वो अभिभूत करता है! महाकुंभ के पूर्ण होने पर जो विचार मन में आए, उन्हें मैंने कलमबद्ध करने का… pic.twitter.com/TgzdUuzuGI
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2025
पंतप्रधान मोदी सोमनाथ मंदिराला भेट देणार -
दरम्यान, महाकुंभाच्या समाप्तीनंतर, पंतप्रधान मोदींनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराला भेट देण्याची घोषणा केली. त्यांनी भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करून त्यांनी सर्व भारतीयांच्या कल्याणासाठी आणि एकतेसाठी प्रार्थना करण्याची इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले असलेल्या सोमनाथला प्रार्थना करण्यासाठी भेट देईन. मी माझी श्रद्धांजली अर्पण करेन आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रार्थना करेन. मला मनापासून आशा आहे की आपल्या देशातील लोकांमध्ये एकतेचा हा शाश्वत प्रवाह अखंड चालू राहील.'