तंत्रज्ञानामधील प्रगती हे आयुष्य जसं सुकर करत आहे तसेच सायबर क्राईम मध्ये ही जटीलता वाढवत आहे. सध्या यूपीआय माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना अनेक फ्रॉड होत आहेत. त्यामध्ये "Jumped Deposit" Scam ची चर्चा आहे. तामिळनाडू पोलिसांनी या स्कॅम बद्दल अलर्ट करण्यास सुरूवात केली आहे. जेथे घोटाळेबाज पीडितेच्या कुतूहलाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन पैसे चोरतात. या घोटाळ्यात पिडीत व्यक्तीच्या बँक खात्यात पाठविलेल्या Unsolicited Deposit अनेकदा एक छोटी रक्कम असते.
एकदा फसवणूक झालेल्या व्यक्तीने त्यांची शिल्लक तपासली की, ते अनवधानाने पैसे काढण्याची विनंती मंजूर करतात, ज्यामुळे त्यांच्या खात्यात अनधिकृत प्रवेश होतो. तामिळनाडू पोलिसांनी Unexpected Deposits घेताना सावधगिरी बाळगण्याचे आणि रकमेची त्वरित पडताळणी करणे किंवा त्यांचा पिन टाकणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
घोटाळेबाज त्वरित कृतींवर अवलंबून असतात आणि बळी नकळत पैसे काढण्यास मान्यता देऊ शकतात. हा घोटाळा काय आहे आणि तुम्ही या नवीन ऑनलाइन फसवणुकीला बळी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता ते देखील जाणून घ्या.
Jumped Deposit Scam काय आहे?
"Jumped Deposit" Scam हा UPI द्वारे मोबाईल बँकिंग वापरणार्यांना लक्ष्य करणारी एक फसवी योजना आहे. घोटाळेबाज त्यांच्या नकळत लोकांच्या बँक खात्यात लहान रक्कम जमा करतात, विशेषत: INR 1,000 ते INR 5,000. ही अनपेक्षित रक्कम एक अधिसूचना ट्रिगर करते, ज्यामुळे पीडिताला त्यांची शिल्लक तपासण्यास प्रवृत्त करते. त्यांचे बँकिंग ॲप उघडल्यानंतर, पीडितेला त्यांचा UPI पिन टाकून बॅलंस पाहण्याचे आमिष दाखवले जाते. मात्र यामुळे नकळत फसवणूक करणार्याला पैसे काढण्याची विनंती मंजूर करते, ज्यामुळे त्यांना मोठ्या रकमेची चोरी करण्याची परवानगी मिळते. हा घोटाळा कुतूहल आणि विश्वासावर केला जात आहे. ज्यामुळे बळी नकळत चोरीला मान्यता देतो.
Jumped Deposit Scam पासून सुरक्षित कसं राहाल?
Jumped Deposit Scam पासून सुरक्षित रहायचं असेल तर नक्कीच तुम्हांला अकाऊंट मध्ये अनपेक्षित काही पैसे येत असतील तर त्याबाबत अलर्ट रहायचं आहे. यावेळी ताबडतोब अकाऊंट चेक करणं टाळा. 15-30 मिनिटं थांबा. म्हणजे त्याची withdrawal requests एक्सपायर होईल. तुम्ही पैसे कुठून आलेत हे नक्की माहिती नसेल तर आधी चूकीचा पिन टाका. अज्ञात स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर अवलंबून न राहता थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधून ठेवीची सत्यता पडताळणे देखील महत्त्वाचे आहे.
सोबतच तुमचा UPI पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका आणि तुमच्या बँक खात्यातील रिअल-टाइम ॲक्टिव्हिटीचे निरीक्षण करण्यासाठी transaction alerts सुरू करून ठेवा. या सावधगिरीचे पालन केल्याने तुम्हाला अशा घोटाळ्यांना बळी पडण्यापासून रोखता येईल.