Reliance Jio (Photo Credit: Facebook)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​दूरसंचार युनिट रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या (Reliance Jio) आयपीओची (IPO) चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. वृत्तानुसार भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी रिलायन्स जिओ लवकरच आपला आयपीओ लॉन्च करू शकते. जिओ आपल्या स्पर्धक व्होडाफोन आयडिया (Vi), भारती एअरटेल आणि बीएसएनएलपेक्षा (BSNL) पेक्षा खूप पुढे आहे. वृत्तानुसार, मुकेश अंबानीचा रिलायन्स जिओ आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरेल, ज्याचे मूल्य $120 अब्ज पेक्षा जास्त असू शकते.

हा आयपीओ 2025 च्या उत्तरार्धात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी रिलायन्स जिओ आयपीओद्वारे 35,000 ते 40,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. सध्या भारतातील सर्वात मोठा आयपीओ ह्युंदाईचा आहे, ज्याची किंमत 27,820 कोटी रुपये आहे. मात्र, ह्युंदाईच्या आयपीओला मागे टाकून जिओचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ बनू शकतो.

भारतीय बाजारपेठेतील हा सर्वात मोठा आयपीओ असेल-

अहवालात म्हटले आहे की, या आयपीओमध्ये कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक नवीन शेअर विक्री आणि ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे शेअर जारी करतील. कंपनी तिच्या इश्यूमध्ये प्री-आयपीओ प्लेसमेंट क्लॉज देखील ठेवू शकते. या आईपीओद्वारे, रिलायन्स जिओचे मूल्य $ 120 अब्जपर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे ती बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी बनेल. कंपनीने आयपीओ जारी करण्याबाबत किंवा त्याच्या मूल्यांकनाबाबत कोणतेही अधिकृत विधान केले नसले तरी, या बातम्यांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा आयपीओ मंजूर झाल्यास भारतीय बाजारपेठेतील हा सर्वात मोठा आयपीओ असेल. (हेही वाचा: Infosys Salary Hike Deferred: इन्फोसिसने वार्षिक पगारवाढ FY25 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत पुढे ढकलली; नोव्हेंबर 2023 मध्ये वाढला होता शेवटचा पगार)

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी-

मुकेश अंबानी यांनी 2019 मध्ये सांगितले होते की, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे आयपीओ पुढील पाच वर्षांत लॉन्च केले जातील. या विधानानंतर सुरुवातीला उत्साह कमी असला तरी आता ही बातमी गुंतवणूकदारांसाठी मोठी आशा बनली आहे. रिलायन्स जिओचा आयपीओ कंपनी आणि तिच्या गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी आणू शकतो. जर रिलायन्स जिओ इन्फोकॉम स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली तर रिलायन्स ग्रुपची स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणारी ती तिसरी कंपनी असेल.

दरम्यान, रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओमध्ये विक्री घटकासाठी मोठी ऑफर असू शकते कारण रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केलेले अनेक गुंतवणूकदार आयपीओमधून बाहेर पडू शकतात. रिलायन्स जिओमध्ये परकीय गुंतवणूकदारांचा सुमारे 33 टक्के हिस्सा आहे. रिलायन्सकडे अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, केकेआर आणि सिल्व्हर लेक सारख्या गुंतवणूकदारांनी 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात कंपनीमध्ये सुमारे $18 अब्ज गुंतवणूक केली होती.