Photo Credit- X

Perth Scorchers vs Melbourne Renegades 26th Match Big Bash League 2024-25 Scorecard: बिग बॅश लीग 2024-25 चा 26 वा सामना आज 7 जानेवारी रोजी पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स (Perth Scorchers vs Melbourne Renegades)यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सने 8 गडी गमावून 147 धावा केल्या. पर्थ स्कॉचर्सकडून ॲश्टन अगरने झटपट अर्धशतक झळकावले.

ॲश्टन अगरने 30 चेंडूत 51 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय ॲरॉन हार्डीने 34 चेंडूत 34 धावा केल्या. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पर्थ स्कॉचर्सची सुरुवात खूपच खराब झाली. यजमान संघाने पहिल्या 6 षटकात 3 गडी गमावून 44 धावा केल्या. स्कॉर्चर्सला पहिला धक्का फिन ऍलनच्या रूपाने बसला. फिन ॲलन 19 धावांवर विल सदरलँडचा बळी ठरला.

यानंतर पुढच्याच चेंडूवर मिचेल मार्श खाते न उघडता बाद झाला. स्कॉचर्सने 100 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. पण ॲश्टन आगरने 51 धावांची तुफानी खेळी करत पर्थ स्कॉचर्सला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. तर मेलबर्न रेनेगेड्ससाठी ॲडम झाम्पाने 4 षटकात 27 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले.

टॉम रॉजर्स आणि कर्णधार विल सदरलँडने 2-2 विकेट घेतल्या. सध्या मेलबर्न रेनेगेड्सला विजयासाठी 20 षटकात 148 धावा करायच्या आहेत. मेलबर्न रेनेगेड्ससाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.