Thief Kisses Woman In Malad: मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad) मधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. चोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरात घुसले. मात्र, परिसरात झडती घेतल्यानंतर त्यांना घरात कोणतीही मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्याने चक्क घरातील महिलेचे चुंबण (Thief Kisses Woman) घेतले. 3 जानेवारी 2025 रोजी मालाडमधील कुरार परिसरात ही घटना घडली होती.
या धक्कादायक घटनेनंतर पीडितेने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारे चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. तथापी, सखोल तपास आणि पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटकं केली आहे. (हेही वाचा-Thane Crime: कुत्र्याच्या भुंकण्यावरून वाद, महिलांची भाजीविक्रेत्याच्या घरावर दगडफेक, मारहाण; 10 जणींविरुद्ध गुन्हा दाखल)
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण -
या असामान्य घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या घटनेने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण लोक अजूनही गुन्ह्याच्या विचित्र स्वरूपावर विचार करत आहेत. (हेही वाचा - Student Stabs Two Classmates In Mumbai: मुंबईतील सायन कोळीवाडा शाळेत बँचवर बसण्यावरून वाद; विद्यार्थ्याने 2 वर्गमित्रांवर केला चाकूने वार)
पार्किंगच्या वादातून मालाडमध्ये 17 वर्षीय विद्यार्थ्याला विवस्त्र करून मारहाण -
मालाड पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 4 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी 5 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मालाड पश्चिम येथील दुर्गादेवी सराफ महाविद्यालयात 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलाने तक्रार दाखल केली होती. भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक, निहार, निशांत, अमीर आणि दोन अनोळखी व्यक्ती अशी या प्रकरणातील आरोपींची नावे होती.
महिला हेल्पलाइन नंबर -
कोणतीही अडचण आल्यास महिलांनी 1091 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय, तुम्ही राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाइन नंबर 7827170170 वर संपर्क करू शकता.