MBA Student Dies By Suicide: मालाड पश्चिम (Malad West) येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास 22 वर्षीय एमबीए विद्यार्थ्याने (MBA Student) आत्महत्या (Suicide) केली. ध्रुविल व्होरा (Dhruvil Vora) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो एमबीएच्या पहिल्या वर्षात होता. ध्रुविलने कचपाडा येथील वासुदेव या त्यांच्या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली.
ध्रुविलवर अभ्यासाचे दडपण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच्या घरी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला कांदिवली पश्चिमेकडील तुंगा रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी मालाड पोलिसांनी शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (हेही वाचा -Ghatkopar Businessman Dies By Suicide: घाटकोपरच्या 56 वर्षीय व्यावसायिकाची वांद्रे-वरळी सी लिंकवर आत्महत्या; मुलासाठी लिहून ठेवली सुसाईड नोट)
पोलिसांनी सांगितले की, ध्रुविल विलेपार्ले येथे शिकत असून तो वसतिगृहात राहत होता. शुक्रवारी तो घरी आला आणि आई आणि बहिणीशी नेहमीप्रमाणे बोलला. कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या वडिलांशीही त्याचे फोनवर बोलणे झाले होते. त्यांची स्कूटर दुरुस्तीसाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने तो निघून गेला. परंतु, त्याने इमारतीवरून उडी मारत आपलं जीवन संपवलं. या घटनेने ध्रुविलच्या कुटुंबियावर दु:खाच्या डोंगर कोसळला आहे. (हेही वाचा - Suicide Attempt In Mantralaya: मंत्रालयात 5 व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी मनधरणी करत केलं रेस्क्यू (Watch Video))
दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी अटल सेतू पुलावरून 38 वर्षीय अभियंत्याने आत्महत्या केली होती. या व्यक्तीचे आत्महत्या करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. ज्यामध्ये तो आपली कार थांबवताना आणि काही सेकंदातचं समुद्रात उडी घेताना दिसला होता. कारुतुरी श्रीनिवास असे या व्यक्तीचे नाव असून, तो डोंबिवलीतील पलावा सिटी येथील रहिवासी होता. मृत कारुतुरी श्रीनिवास हा त्याची पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसोबत राहत होता. (हेही वाचा - Police personnel Commits Suicide: गेल्या 24 तासात राज्यात दोन पोलिसांच्या आत्महत्या; पोलीस प्रशासात खळबळ)
बुधवारी रात्री आपल्या व्यावसायिक भागीदाराला भेटायला जात असल्याचे सांगून तो घरातून निघून गेला होता. बुधवारी रात्री सुमारे 10.30 वाजेपर्यंत, तो त्यांचे कुटुंब आणि त्यांना भेटायला आलेल्या नातेवाईकांशी गप्पा मारत होता. नातेवाईक निघून गेल्यानंतर श्रीनिवास आपल्या व्यावसायिक भागीदाराला भेटायला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने दुपारच्या सुमारास अटल सेतू पुलावरून उडी मारली.