Ghatkopar Businessman Dies By Suicide: बुधवारी संध्याकाळी, 56 वर्षीय भावेश सेठ या व्यावसायिकाने (Businessman) मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) वरून पाण्यात उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. 'सॉरी बेटा, कुटुंबाची काळजी घ्या,' अशी सुसाईड नोट भावेश सेठ यांनी लिहून ठेवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिमेतील रहिवासी भावेश सेठ हे बॉल बेअरिंगचा व्यवसाय करत होते. त्याच्यावर मोठे कर्ज होते आणि त्याला मानसिक आव्हानांचा सामना करावा लागत होता. ज्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सेठ वांद्रे वरळी सी-लिंक येथे आले. त्यांनी एका अज्ञात व्यक्तीकडून लिफ्ट मागितली. कार चालकाने त्यांना सी लिंकच्या मध्यभागी थांबवले. पाण्यात उडी मारण्यापूर्वी सेठने त्याचा मुलगा स्मिथ सेठ (28) याला शेवटचा कॉल केला. यावेळी ते आत्महत्या करत असल्याची माहिती त्यांनी मुलाला दिली. (हेही वाचा - Suicide Attempt In Mantralaya: मंत्रालयात 5 व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी मनधरणी करत केलं रेस्क्यू (Watch Video))
सीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मच्छिमार समुदायाच्या स्थानिकांना सेठचा मृतदेह तरंगताना दिसला आणि त्यांनी पोलिसांची वाट न पाहता तात्काळ त्यांची मासेमारी बोट घेऊन बचाव मोहीम सुरू केली. स्थानिकांनी केलेल्या बचाव कार्यादरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सेठ यांना भाभा रुग्णालयात नेले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा - Police personnel Commits Suicide: गेल्या 24 तासात राज्यात दोन पोलिसांच्या आत्महत्या; पोलीस प्रशासात खळबळ)
पोलिसांना सेठ यांनी मुलाला लिहिलेली ‘सुसाईड नोट’ सापडली, ज्यामध्ये 'सॉरी बेटा सर्व गोष्टींसाठी, कुटुंबाची काळजी घ्या,' असे लिहिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेठ हे बॉल बेअरिंग कंपनी चालवत होते आणि त्याच्यावर मोठे कर्ज होते. त्यांचा मुलगा स्मिथ सेठ देखील कौटुंबिक व्यवसायाला हातभार लावण्यात सक्रियपणे सहभागी होता. वांद्रे पोलिस स्टेशनने या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आणि घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली.