Mumbai Shocker: मालाड मध्ये 15 हजार रूपयांसाठी वृद्ध महिलेचा भिंतीवर डोकं आटपून खून; आरोपी अटकेत
Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

मालाड (Malad)  मध्ये 89 वर्षांच्या महिलेच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी मुंबई पोलिसांनी मर्डर मिस्ट्री उलगडली आहे. यामध्ये पोलिसांनी 45 वर्षीय एका व्यक्तीला अटक केली आहे. 15 हजार रूपयांसाठी या व्यक्तीने वृद्ध महिलेचा खून केला आहे. आरोपीचं नाव बैजू मुखिया आहे. बैजू हा बिहारचा रहिवासी आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, खून झालेली वृद्ध महिला शांतीबाई तिच्या नातवाशी बोलताना आरोपीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. तिच्याकडे 15 हजार रूपये आहेत ते त्याला द्यायचे आहेत. बैजू या महिलेच्या घरात छपरावरून चढला. घरात घुसल्यानंतर बैजूने महिलेचे डोकं भिंतीवर डोकं आटपून तिचा खून केला. ही महिला नजिकच्या मंदिरात भीक मागून पैसे कमावत होती. आरोपी हा 15 दिवसांपूर्वी त्या भागात राहायला आला होता.

पोलिसांना तपासामध्ये असं समजलं की महिलेचा खून तिचं डोकं भिंतीवर आटपून झालं आहे. या महिलेच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. तिच्या घरातून जेव्हा रक्त बाहेर आल्यानंतर पोलिसांना या खूनाचा प्रकार समजला. तेव्हा पोलिसांना समजलं की या खूनाच्या मागे घर आणि पैसे यांची माहिती असलेला व्यक्ती असेल असं समजलं. Mumbai Murder Case: दक्षिण मुंबई च्या Nepean Sea Road वरील इमारतीत व्यावसायिकाच्या 63 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या, नोकरावर संशयाची सुई .

बैजू हा पोलिसांचा संशयित होता. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. त्यावेळी गुन्ह्याची त्याने कबुली दिली. मग पोलिसांनी त्याला अटक केली.