Thane Crime: ठाण्यात पाळीव कुत्र्याच्या भुंकण्याला (Dog Barking) कंटाळून काही महिलांनी मालक भाजीविक्रेत्याच्या कुटुंबाला मारहाण (Vegetable Seller) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 10 जणींच्या गटाने त्यावेळी भाजीविक्रेता त्याची पत्नी आणि मुलीला मारहाण केली. ही मारहाण फक्त कुत्र्याच्या भुंकण्यावरून नसल्याचे सांगण्यात येत आहे. पिडीत आणि महिला या शेजारी राहतात. त्यांच्यात आधीही कोणत्यातरी कारणावरून वाद होते. रविवारी आंबिवली येथे मारहाणीची ही घटना घडली. (Alandi Shocker: आळंदीत खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 2 मुलांवर लैंगिक अत्याचार; संस्थाचालकाच्या आरोपी नातेवाईकाला अटक)
या प्रकरणी भाजी विकेत्याने खडकपाडा पोलीस ठाण्याच्या तक्रा दाखल केली. तक्रीत त्याने उल्लेख केला की, 'रविवारी सायंकाळी भाजी विक्रेत्याच्या पाळीव कुत्र्याने परिसरात भुंकण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात आरोपी त्याच्या घरी पोहोचल्या आणि त्याला, त्याची पत्नी आणि मुलीला मारहाण केली.' आरोपींनी त्यांच्या घरावर दगडफेक आणि तोडफोडही केल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत विक्रेता आणि त्याचे कुटुंबीय जखमी झाले आहे.
भाजी विक्रेत्याच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी सोमवारी 10 आरोपी महिलांविरुद्ध हिंसाचार, बेकायदेशीर एकत्र येणे, हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने कृत्य करणे, अशांतता निर्माण करणे आणि दुर्भावनापूर्ण हेतूने हल्ल्या केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविला आहे.