Knife Attack | (Photo credit: archived, edited, representative image)

Student Stabs Two Classmates In Mumbai: मुंबईतून (Mumbai) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायन कोळीवाडा येथील शाळेतील (Sion Koliwada School) वर्गात बसण्याच्या व्यवस्थेवरून झालेल्या वादाला (Controversy Over Sitting On Bench) सोमवारी सकाळी हिंसक वळण लागले. रागाच्या भरात एका विद्यार्थ्याने शाळेच्या बॅगमधून काढलेल्या चाकूने दोन वर्गमित्रांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पालकांनी शाळांमधील सुरक्षा उपायांवर चिंता व्यक्त केली आहे.

10 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये बाकावर बसण्यावरून वाद -

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी 10 वीच्या चार विद्यार्थ्यांमध्ये डेस्कवर बसण्यावरून वाद झाले. हा वाद शारिरीक बाचाबाचीत वाढला, ज्या दरम्यान एका विद्यार्थ्याने त्याच्या मित्राला त्याच्या बॅगमधून चाकू काढण्याची सूचना केली. त्यानंतर दोन विद्यार्थ्यांवर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले. (हेही वाचा -Honour Killing In Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगर मध्ये 17 वर्षीय बहिणीला चुलत भावानेच 200 फूटांवरून ढकललं; प्रेमप्रकरणातून हत्या)

जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल -

दरम्यान, या घटनेची माहिती मुख्याध्यापकांसह शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना सायन रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात अँटॉप हिल पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा -Mumbai Shocker: मोठ्या बहिनीला जास्त प्रेम करते म्हणत लहान मुलीने केली आईची हत्या, पोलिसांनी केली अटक)

दोन विद्यार्थ्यांना घेण्यात आले ताब्यात -

पोलिसांनी 15 आणि 16 वर्ष वयोगटातील दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळेत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांवर वार करणाऱ्यावर औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.