Representational Image (Photo Credits: File Photo)

Mumbai Shocker: मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील कुरेशी नगरमध्ये ही घटना घडली आहे. जिथे एका मुलीने आपल्या ६२ वर्षीय आईची हत्या केली. तिने पोलिस ठाणे गाठून पोलिसांना खुनाची कबुली दिली. प्राथमिक तपासात कौटुंबिक वैमनस्य समोर आले आहे. आरोपीचा असा विश्वास होता की, तिची आई तिच्यापेक्षा मोठ्या बहिणीला जास्त प्रेम करते. साबिरा बानो असगर शेख आणि मुलगी रेश्मा अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला अटक करून तपासाला वेग दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून आई आणि मुलीमध्ये वाद सुरू होता. काल संध्याकाळीही त्यांच्यातील वाद इतका वाढला की, दोघांमधील वाद हाणामारी पर्यंत गेला होता. यानंतर आरोपी मुलीने घरात ठेवलेल्या चाकूने आईवर हल्ला करून तिची हत्या केली. रेश्मा मुजफ्फर काझी असे आरोपी मुलीचे नाव आहे. हे देखील वाचा: Wrestler Dies of Heart Attack: वडिलांचं स्पप्न भंगलं! साताऱ्यातील 14 वर्षीय पैलवानाचा सरावादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

साबिरा बानो आपल्या मुलासोबत मुंब्रा येथे राहत होत्या. २ जानेवारी रोजी सायंकाळी ती कुर्ला येथील कुरेशी नगर येथे मुलीला भेटण्यासाठी आली असता आरोपी रेश्मा ने तिच्या आईशी भांडण करण्यास सुरुवात केली. तिची आई मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते आणि तिचा तिरस्कार करते असे तिला वाटत असल्याने ती रागावली होती. हा खून केल्यानंतर आरोपीने थेट चुनाभट्टी पोलिस ठाणे गाठून आईची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.