Death PC PIXABAY

महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मध्ये ऑनर किलिंगची (Honor Killing)  एक घटना समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारामध्ये 17 वर्षीय मुलीचा 200 फूट डोंगरावरून ढकलल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणामधून या मुलीच्या चुलत भावानेच तिला ढकलल्याचं समोर आलं आहे. यामध्ये मृत मुलगी 17 वर्षीय आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान नम्रताच्या कुटुंबाने तिची समजूत काढण्यासाठी संभाजीनगर मध्ये वळदगावात तिच्या काकांच्या घरी तिला पाठवले होते. मृत तरूणीचा चुलत भाऊ ऋषिकेश शेरकर याने तिला खावडा डोंगरावर नेले. तेथूनच तिला खाली दरीत फेकले. नक्की वाचा: Maharashtra Honour Killing: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना; आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून तरूणाचा खून.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी ऋषिकेश शेरकर विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला अटक केली आहे. मन सुन्न करणारी ही घटना गावात सर्वत्र पोहचली आहे.