Mumbai Shocker: वरळी भागात आढळला मुलीचा हात-पाय तोडल्याच्या अवस्थेत गोणीत मृतदेह; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
Murder प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

मुंबई मध्ये वरळी सी लिंक (Worli Sea Link) भागात एका मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे हात पाय तुटलेल्य अवस्थेमध्ये गोणीत आढळले आहेत. पोलिसांना या गोष्टीची खबर मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. सध्या तो पोस्टमार्टम साठी रूग्णालयात पाठवला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वरळी कोळीवाडा या परिसरामध्ये आयएनएस राहताच्या पाठीमागे काल संध्याकाळी मृतदेहाची गोणी काही लोकांना आढळून आली. गोणीत तरुणीचे हायपाय तोडून भरलेले होते. त्याचा उग्र वास सुटला होता. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

पहा ट्वीट

मैत्री, प्रेम, लिव्ह ईन ते एकतर्फी प्रेम यामधून मागील काही महिन्यात अमानुषपणे मुलींचा खून केल्याचा, त्यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना ताज्या आहेत. पुण्यात नुकत्याच अशा 2 घटना समोर आल्या आहेत. एका सरकारी अधिकारी झालेल्या तरूणीचा राजगडाजवळ मृतदेह आढळला तर दुसरी वर कोयत्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीमध्ये एकतर्फी प्रेमाचा अ‍ॅंगल होता.