Mumbai: महिलेने हिजाब घातल्याने वरळीतील एका रेस्टॉरंटमध्ये नाकारला प्रवेश, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

Mumbai: मुंबईतील वरळी येथील एका रेस्टॉरंटमध्ये महिलेने हिजाब घातला होता म्हणून तिला प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. तसेच नेटिझन्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार वरळीतील एट्रिया मॉल मधील एका रेस्टॉरंट मधील असल्याचे बोलले जात आहे.(Pune: गरोदर महिलेस डॉक्टरांकडून अमानुष मारहाण; नामांकित रुग्णालयातील धक्कादायक प्रकार)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये टॅब रेस्टो बारमध्ये आलेल्या एका महिलेला तेथील कर्मचाऱ्याने तिचा हिजाब काढण्यास सांगितला. तर महिलेच्या मित्रांना सुद्धा कर्मचाऱ्यांनी तिला तसे करण्यास सांगावे असे म्हटले. यामध्ये अन्य एका कर्मचारी महिलेला म्हणतो की, आम्ही रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून येणाऱ्यांना प्रवेश देत नाही. ऐवढेत नव्हे तर भारतीय पोशाखांना सुद्धा परवानगी नसल्याचे ही म्हटले जात आहे.(Andheri Chain Snatching: अंधेरीमध्ये महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या व्यक्तीला पोलिसांना घातल्या बेड्या)

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝒮ak (@sakinamaimoonn)

दरम्यान, एखाद्याच्या पोशाखावरुन व्यक्तीला प्रवेश नाकारणे चुकीचे आहे. त्याचसोबत महिलेसोबत जे वर्तन करण्यात आले त्यावरुन आता नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याआधी सुद्धा एका महिलेचा अशाच प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा सुद्धा नागरिकांनी हॉटेलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.