Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

दोन-तीन दिवसांपूर्वी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. पण आता हे आली आहे.  तुम्ही ऑनलाईन पद्धतीन अर्ज करत असाल तर सावधान कारण तुम्ही अर्ज करत असलेली लिंक ही खरी किंवा अधिकृत आहे का? की ती फेक आहे अर्ज भरण्यापुर्वी तपासून घ्यावे.  सायबर ठगांनी म्हाडाची एक बनावट वेबसाइट तायर केलीय. म्हाडाच्या वेबसाईटसारखीच खोटी वेबसाइट तयार केलीय. या वेबसाईटवरुन अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा -  Mumbai MHADA Housing Lottery 2024: मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांसाठी housing.mhada.gov.in वर आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या पात्रता निकष ते घरं कोणत्या भागात उपलब्ध?)

सायबर ठगानी ऑनलाईन जाहिरात करत ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढलं जात आहे. काही अर्जदारांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीजण गोरेगावचे घर दाखवत आहेत. त्यातील एक महिला घर पाहिजे तर 6 लाख भरा असं आवाहन करत आहे. ठगांनी हुबेहूब म्हाडासारखे संकेतस्थळ बनवले आहे. फोटो, रंगसंगती सेम टू सेम आहेत. सदनिकेची पूर्ण किंमत 29 लाख सांगितली आहे. अशा घटना म्हाडाच्या लक्षात आल्यानंतर म्हाडाच्या आयटी सेलने यासंदर्भात आता सायबर सेलकडे तक्रार केली आहे. म्हाडाच्या आयटी विभागाने यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार केली. हाती आलेल्या माहितीनुसार, बोगस वेबसाईट mhada.org अशी आहे. तर housing.mhada.gov.in ही खरी वेबसाईट आहे.

मुंबई आणि कोकण विभागातील नागरिकांसाठी म्हाडाने मोठ्या प्रमाणावर घरांची जाहिरात काढली आहे. मुंबईत दोन हजारांसाठी तर कोकण मंडळाकडून तब्बल 9 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आलीय. यामुळे मुंबईसह कोकण विभागातील तब्बल 11 हजार नागरिकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात म्हाडाकडून यासंदर्भात जाहिरात काढण्यात येणार आहे.