महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (MHADA) मुंबई (Mumbai) मध्ये 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज नोंदणीला सुरूवात झाली आहे. या म्हाडाच्या घरांसाठी 13 सप्टेंबरला सोडत जाहीर केली जाणार आहेत. दरम्यान यामध्ये मुंबईच्या विविध भागांत 30 लाखांपासून साडेसात कोटी पर्यंत घरं उपलब्ध आहेत. मुंबई मध्ये म्हाडाच्या घरासाठी इच्छूक असलेल्यांना दुपारी 12 वाजल्यापासून housing.mhada.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. म्हाडाच्या लॉटरी मध्ये अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले असून त्यांच्या अंतर्गत विविध घरं उपलब्ध करण्यात आली आहेत.
मुंबई मध्ये 2030 घरांमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत. यामध्ये म्हाडाने बांधलेल्या 1327 घरांसोबत कास नियंत्रण नियमावाली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डर्सकडून मिळालेली 370 घरं आणि पूर्वीच्या लॉटरीत विविध ठिकाणी उरलेल्या 333 घरांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. नक्की वाचा: MHADA House: दिलासादायक! आता म्हाडाचे घर मिळणे झाले आणखी सोपे; अवघ्या सहा कागदपत्रांची आवश्यकता, पहा यादी.
मुंबई म्हाडा घरांच्या लॉटरी मधील महत्त्वाच्या तारखा?
- ऑनलाईन अर्ज - 9 ऑगस्ट 2024 पासून सुरू
- अनामत रक्कम भरण्याची वेळ - 9 ऑगस्ट दुपारी 12 पासून - 4 सप्टेंबर 11.59 पर्यंत
- ऑनलाईन अर्जाचा शेवटचा दिवस- 4 सप्टेंबर 2024
- सोडतीची प्रारूप यादी - 9 सप्टेंबर 2024 (संध्या 6 नंतर)
- प्रारूप यादी वर आक्षेप सादर करण्याचा वेळ - 10 सप्टेंबर दुपारी 12 पर्यंत
- सोडतीसाठी अंतिम यादी - 11 सप्टेंबर (संध्या 6 नंतर)
- म्हाडाच्या घरांसाठी सोडत - 13 सप्टेंबर 2024 (सकाळी 11 वाजता)
मुंबई मध्ये कोणत्या भागात घरं होणार उपलब्ध?
सायन पूर्व, दादर, माहीम, पहाडी गोरेगाव पश्चिम, अॅटॉप हिल वडाळा, कोपरी - पवई, कन्नमवार नगर - विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड, नेहरू नगर -कुर्ला, बोरिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, डी एन नगर, सुभाष नगर - चेंबूर, शास्त्रीनगर - गोरेगाव पश्चिम, मिठा नगर - मुलुंड, ओशिवरा, भायखळा, माझगाव, लोअर परळ, घाटकोपर, कांदिवली पश्चिम, जुहू, ताडदेव, मानखुर्द, चारकोप - कांदिवली
MHADA च्या नियमांनुसार, कोणत्या घरांसाठी कोण पात्र?
म्हाडाच्या नियमावली नुसार, EWS category साठी अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न 6 लाख प्रतिवर्ष, LIG category साठी 6-9 लाख प्रतिवर्ष, MIG category साठी 9-12 लाख आणि 12 लाख पेक्षा अधिक उत्पन्न असणार्यांसाठी HIG category मधील घरं उपलब्ध असतील.
आज म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट https://housing.mhada.gov.in वरून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. तसेच अर्जदार MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करून देखील अर्ज दाखल करू शकतात.