Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Mhada House: मुंबईत आपलं हक्काचं घर असावे हे सर्व सामान्य लोकांना नेहमीच वाटतं असतं. त्यामुळे शहरात म्हाडा आणि सिडको लॉटरी पध्दतीने आणि स्वस्त घरांची सोडत करत असतात. आता पर्यत लाखो लोकांनी स्वस्तात म्हाडाची घरे घेऊन स्वप्न पूरी केली आहेत. दोन दिवसांपूर्वीच म्हाडाने घरांची सोडत जाहीर केली आहे. परंतु एकीकडे म्हाडाच्या घरांची किमंत ऐकून मुंबईकर हैराण झाले आहे. स्वस्तात असलेली म्हाडाची घरे आता मुंबईकरांना परवडणार नाही असं वाटू लागले आहे. (हेही वाचा-  मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांसाठी housing.mhada.gov.in वर आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या पात्रता निकष ते घरं कोणत्या भागात उपलब्ध?)

मुंबई मंडळाकडून अल्प उत्पन्न गटासाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात वरळी, दादर अश्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये वरळी येथील सस्मिरा येथे 550 चौ. फुटाचा्या फ्लॅटची किंमत तब्बल 2 कोटी 62 कोटी इतकी आहे. ही किंमत इतकी ऐकून सर्वसामान्यांना घाम फुटला आहे.

विशेष बाब म्हणजे, विजेत्याला या किमती सोबत सेवाशुल्क आणि मालमत्ता कर भरावा लागणार आहे. त्यामुळे घराची किमत दुप्पट झाली आहे. वार्षिक उत्पन्न 9 लाख असणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने घरांची सोडत जाहिर केली. बॅंक लोन देईल का असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. मुंबई मंडळाने सांगितल्या प्रमाणे, मानखुर्द येथे सर्वात कमी किमतीचे फ्लॅर्ट उपलब्ध आहे.