भारतात (India) अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. परंतु, दिवाळी (Diwali 2019) हा एकमेव सण आहे, ज्यात पहाटे उठून केलेले अभ्यंगस्नान, दारात आकाशकंदीलाचा उजेड, लखलख करणाऱ्या दिव्यांनी सजवलेले घर, अंगात नवे कपडे आणि फराळांचा सपाटा आणि फटक्यांची आतिषबाजी केली जाते. महत्वाचे म्हणजे, लहान मुलांना फटाक्यांचे सर्वात जास्त आकर्षण असते. दरम्यान, पालकांनी योग्य काळजी न घेतल्यास मोठ्या नुकसानाला समारे जावा लागते. यावेळी पालकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारचे फटाके फोडण्यापासून आपल्या लहान मुलांना थांबवू शकाल याचा एकदा तरी पालकांनी विचार करायला हवा.
दिवाळीत फटाके फोडत असताना अनेकांना इजा झाली असल्याची बातमी आपल्या कानावर नेहमी पडत असते. एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय भाजल्यास, अशा वेळी त्या व्यक्तीवर ताडतीने उपचार झाले पाहिजेत. यासाठी काय काळजी घ्यावी लागेल विविध रुग्णालयात यावर प्राथमिक उपचार सुचवले आहे.
फटाके फोडताना काय काळजी घ्याल
1) शरिर पूर्णपणे झाकेल, असे कपडे घालावेत
2) कॉटन कपड्यांचा वापर करावा
3) लहान मुले फटाके फोडत असताना, मोठ्या थोरांनी लक्ष द्यावे.
4) फटाके उडविण्यासाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा.
5) फटाके उडवितांना शक्यतो सुती कपडे वापरावेत. कारण सुती कपडे लवकर पेट घेत नाहीत.
6) गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल सांडलेले असते. या वस्तू लगेच पेट घेऊ शकतात.
7) विजेच्या डिपीजवळ फटाके उडवणे टाळा.
8) मोठा आवाज होणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभेचे आणि आसमंत उजळून टाकणारे फटाके वापरा.
9) सुरसुऱ्या, फुलबाजा विझल्यानंतर त्या पाण्यात टाकाव्यात. त्या इतर कुठेही टाकल्यास कुणाचा पाय किंवा हात भाजण्याची शक्यता असते.
वाचा- Diwali 2019: यंदा दिवाळीसाठी पारंपारिक आकाश कंदील घरच्या घरी कसा बनवाल? (Watch Video)
दिवाळीत लहानपासून थोरांपर्यंत सर्वच फटाके फोडतात. दरम्यान कोणतीही इजा झाली तर, घरगुती उपाय करण्यापेक्षा जवळील रुग्णालयात जाऊन उपचार घेणे सोयस्कर ठरते.