Diwali kandeel (File Photo)

भारतात दिवाळी हा उत्सव मोठ्या उत्हासाने साजरा केला जातो. प्रभु रामचंद्र यांनी तब्बल 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील प्रजेने रामचंद्र आणि सीताचे स्वागत दिपोत्सव केला होता. त्यानंतर संपूर्ण भारतात दिवाळी हा सण धुमधडाक्याने साजरा होऊ लागला. दीपज्योत हे परमेश्वरांचे प्रतीक आहे, असे अनेकांचा समज आहे. यामुळे दिवाळीच्या उत्सवात घराबाहेर पणती लावून अंगण सजवले जाते. त्याचबरोबर घराचे शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक कौशल्याचे आकाशकंदील लावले जातात. दिवाळी उत्सवाला अवघे काहीच दिवस राहिले असून सध्या बाजारात आकाशकंदीलाची मागणी वाढली आहे. त्यावेळी बाजातून आकाशकंदिल खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिश्याला कात्री लागते. दरम्यान, ग्राहकांची लूट होऊ नये, म्हणून खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जपणारी पारंपरिक कंदिलाची परंपरा कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्याच्या काळात चानी कंपनीची कंदिले बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे काही लोक पारंपारिक कंदिल खरेदी न करता, चीनी आकाशकंदील खरेदी करायला पसंती करतात. परंतु या दिवाळीत पारंपारिक आकाशकंदील घरच्या घरी कसा बनवाल याची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Happy Diwali 2019 In Advance: दिवाळीच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

पाहा व्हिडिओ-

कागदी आकाश कंदील बनवण्याची पद्धत

भारतात पारंपारिक सणाला मोठे महत्व दिले जाते. परंतु, सध्या पारंपारिक पद्धतीने सण साजरा करण्याची संख्या कमी होत चालली आहे. प्रत्येक नागरिकांनी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे.