मासिक पाळी (Period) दरम्यान आपल्या पुरुष जोडीदारासोबत सेक्स करण्याची इच्छा अनेक महिलांना होते. कारण तो काळच असतो. मासिक पाळी मध्ये स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अशा वेळी त्या सेक्स (Sex) करण्यासाठी देखील उत्तेजित होतात. तसेच अनेकदा पुरुष जोडीदाराला देखील आपल्या महिला पार्टनरच्या मासिक पाळीदरम्यान सेक्स करण्याची इच्छा होते. मात्र अशा वेळी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला शरीरासंबंधी गंभीर आजार होऊ शकतो वा एखादे व्यंग येण्याची देखील शक्यता असते.
अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचा नेहमी हाच सल्ला असतो की मासिक पाळी दरम्यान शक्यतो सेक्स करणे टाळावे. कारण या दरम्यान महिलांचे शरीर थोडे अशक्त झालेले असते. तसेच त्यांना वेदना देखील होत असतात. अशा वेळी त्यांना आरामाची सक्त गरज असते. मात्र तरीही अनेकांना मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे आवडते.
मासिक पाळी दरम्यान पुढे दिलेल्या गोष्टींची घ्या काळजी:
1. नॅपकिन आणि टॉवेलचा वापर
पीरियड्स दरम्यान सेक्स करताना बेडवरती गडद रंगाचे बेडशीट टाका. सेक्स झाल्यानंतर नॅपकिन वा टॉवेलचा वापर करुन रक्ताचे डाग पुसून घ्या. तसेच आपली गुप्तांगाची जागा देखील पाण्याने धुवून घ्या. अन्यथा गर्भधारणा देखील होण्याची शक्यता असते.हेदेखील वाचा- Sex Tips: अनेक सेक्स पोजिशन्स मधील सर्वाधिक महिलांना आवडतात संभोगाचे 'हे' प्रकार
2. पाळीच्या तिस-या वा चौथ्या दिवशी सेक्स
जर महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होत असेल तर पहिल्या आणि दुस-या दिवशी सेक्स करणे टाळा. कारण बहुतेकदा पहिले दोन दिवस जास्त रक्तस्त्राव होतो. त्याच्या तुलनेत तिस-या आणि चौथ्या दिवशी कमी रक्तस्त्राव होतो. त्यावेळी सेक्स करण्याची योग्य वेळ मानली जाते.
3. आरामदायी सेक्स पोजिशन्स
पीरियड्स दरम्यान महिलांना प्रचंड वेदना होत असतात. अशा वेळी अवघड सेक्स पोजिशन्स ट्राय करून भलते प्रयोग करायला जाऊ नका. त्यापेक्षा आरामदायी अशा सेक्स पोजिशन्स निवडा.
4. शॉवर सेक्सला द्या प्राधान्य
मासिक पाळी दरम्यान शॉवर सेक्स करण्याला प्राधान्य द्या. त्यामुळे अशुद्ध रक्त अंगावर जास्त वेळ न राहता ते पाण्याने साफ होईल. तसेच तुमचे गुप्तांग देखील साफ होत राहील.
पीरियड्स दरम्यान अनेक व्हायरस आणि विषाणू यांचा प्रसार सर्वात अधिक होण्याची शक्यता असते. अशा वेळी अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर त्याचा परिणाम सरळ सरळ तुमच्या शरीरावर होऊन तुम्हाला नको त्या आजारांना सामोरे जावे लागेल.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)