Coronavirus Vaccine Dose: कोरोना लसीचा दुसरा डोस घेणं का आवश्यक आहे का? जाणून घ्या तज्ञाचं मत
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

Coronavirus Vaccine Dose: भारतात आज कोरोना लसीकरण (Corona Vaccination)मोहीमेला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस (First Dose) देण्यात येत आहे. या पहिल्या डोसाच्या एक महिन्यानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. कोरोनाविरूद्ध लढ्यात लसीचे दोन्ही डोस आवश्यक आहेत. आज, लसीकरण मोहिमेची सुरूवात करताना पंतप्रधान मोदींनी लोकांना या लसीचे दोन्ही डोस घेण्यास सांगितले आहे. लसीचा दुसरा डोस का महत्त्वाचा आहे आणि तो न घेतल्यास आपणास काय नुकसान होऊ शकते हे या लेखातून जाणून घेऊयात. (Coronavirus Vaccine Precautions: कोरोना लस घेण्याअगोदर किंवा नंतर मद्यपान केल्यास होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम; जाणून घ्या काय आहे वैज्ञानिकांचं मत)

लसीचा दुसरा डोस का महत्त्वाचा आहे?

व्हायरोलॉजिस्ट कोरोना लसच्या दोन्ही डोसांचे काटेकोरपणे पालन करण्याची शिफारस करत आहेत. तज्ञांच्या मते, लसीचा पहिला डोस शरीरात लॉन्चपॅड म्हणून कार्य करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. तसेच दुसरा डोस रोगप्रतिकारक प्रतिक्रियेस विषाणूंविरूद्ध लढण्यास मजबूत करतो. लसीचा पहिला डोस रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करतो, जो तीन ते चार आठवड्यांत शरीरात न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी बनवण्यास सुरुवात करतो. (वाचा - Coronavirus Vaccination Process: तुम्हाला कोरोना लस घ्यायची आहे का? जाणून घ्या लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया)

आयसीएमआरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, लसीचा दुसरा डोस शरीरात अँटीबॉडीसमवेत टी सेल्स वाढविण्यासाठी कार्य करेल. या टी सेल्सला किलर सेल्स असेही म्हणतात. ते व्हायरसवरील प्रतिकारशक्तीसह एकत्र काम करतात. या व्यतिरिक्त, लसीचा दुसरा डोस दुहेरी संरक्षण प्रदान करेल. (Bharat Biotech च्या Covaxin लसीचे दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई मिळणार)

लस संशोधक प्रसाद कुलकर्णी यांच्या मते, लसीचा पहिला डोस निश्चितच काही काळ व्हायरसवर कार्य करेल. परंतु, दुसऱ्या डोसमुळे अँटीबॉडीमध्ये वाढ होईल, ज्यामुळे व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी दीर्घ प्रतिकारशक्ती प्रदान होईल. याचा सोपा अर्थ असा आहे की, ही लस दोन महिन्यांत विषाणूविरूद्ध संपूर्ण संरक्षण प्रदान करेल. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूची लस घेतल्यानंतरही लोकांना मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागेल. तरचं या विषाणूचा संसर्ग रोखता येईल.