Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

Coronavirus Vaccination Process: कोरोना व्हायरसने (Coronavirus) वर्षभर संपूर्ण जगाला विळखा घातला. आता यावर मात करण्याची वेळ आली आहे. देशात आजपासून लसीकरण प्रक्रिया (Vaccination Process) सुरू झाली आहे. कोरोना लस हा व्हायरस नियंत्रित करण्याचा एकमेव चांगला मार्ग आहे. आपण ही लस घेणार असाल, तर आपल्याला कोणत्या प्रक्रियेमधून जावे लागेल हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. लसीकरण मोहिमेत आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देत आहोत. (PM Modi Launches COVID-19 Vaccination Drive: ‘Dawai bhi, Kadai bhi’ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला नवा मंत्र)

कोव्हिन अ‍ॅप बद्दल जाणून घेणे महत्वाचे :

आपण कोरोना लसीकरण करणार असाल, तर कोव्हिन अ‍ॅप काय आहे याबद्दल निश्चितपणे जाणून घ्या. कोव्हिन अ‍ॅप हे भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने तयार केलेले अ‍ॅप आहे. या अ‍ॅपद्वारे लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. लसीची नोंदणी करण्यापासून ते लसीकरण पर्यंतची सर्व कामे या अॅपच्या माध्यमाद्वारे करण्यात येतील. लसीकरण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवू नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. आपण हे कोव्हिन अ‍ॅप डिजिटल प्लॅटफॉर्मवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता.

आपल्याला लस घ्यायची असल्यास स्वत: ची नोंदणी करा:

ज्यांना कोरोनाची लस घ्यायची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम अ‍ॅपद्वारे स्वत: ची नोंदणी केली पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल. यात त्या व्यक्तीला कोणत्या केंद्रात लसीकरण करण्यात येईल यासंदर्भात माहिती देण्यात येईल. लसी देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक आयडी देण्यात येईल आणि हा कोड सरकारच्या डिजी लॉकर अ‍ॅपमध्येही सुरक्षित ठेवला जाईल.

लसीकरण प्रक्रिया:

आपण ज्या केंद्रावर आपल्याला लस घ्यायची आहे तेथे पोहोचता तेव्हा प्रथम आपले थर्मल स्कॅनिंग केले जाईल आणि नंतर तुम्हाला आपला नोंदणी क्रमांक सांगावा लागेल. त्यानंतर हा नंबर अ‍ॅप्लिकेशन्सच्या यादीशी जुळल्यानंतर तुम्हाला फोनवर मिळालेला मेसेजदेखील दर्शवावा लागेल. यानंतर, दुसर्‍या टेबलवर जाऊन आपल्याला आपला ओळखपत्र दाखवाव लागेल (उदा. आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आपली ओळख जुळल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल.

ही लस किती आणि किती वेळ घेईल:

नोंदणी आणि ओळखीच्या प्रक्रियेनंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे लसीकरण करणे. शेवटी तुम्हाला तिसर्‍या टेबलवर पाठवले जाईल, जेथे तुम्हाला लस देण्यात येईल. ही लस देण्यासाठी केवळ पाच ते सात मिनिटांचा कालावधी लागतो. लस घेतल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी अर्धा तास ठेवलं जाईल. यानंतर, तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता.