Coronavirus Vaccine Precautions: आजपासून भारतात कोरोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण करण्यात येणार असून नंतर टप्प्याटप्प्याने सर्वसामान्य लोकांना लसीकरण केलं जाईल. तथापि, भारतात अधिकृतपणे लस घेतल्यानंतर मद्यपान करण्याशी संबंधित कोणताही सूचना देण्यात आलेली नाही. परंतु, असं असलं तरी, जगभरातील तज्ञ लोकांनी कोरोना लस घेण्यापूर्वी आणि कोरोना लस घेतल्यानंतर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. (वाचा - Bharat Biotech च्या Covaxin लसीचे दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई मिळणार)
मद्यपान करण टाळावं -
कोरोना विषाणूची लस घेण्यापूर्वी तसेच नंतरही अल्कोहोलचे सेवन करणे टाळावे. अल्कोहोलचा आपल्या रोग प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्या शरीरात संसर्गाविरूद्ध लढण्याची क्षमता कमी होते. कोरोना लस रोग प्रतिकारशक्तीवर कार्य करते. म्हणूनच, आरोग्य तज्ञांच्या मते लस घेण्यापूर्वी आणि नंतर काही दिवस मद्यपान करू नये. (Coronavirus Vaccination Process: तुम्हाला कोरोना लस घ्यायची आहे का? जाणून घ्या लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया)
लस घेतल्यानंतर किती दिवस मद्यपान करू नये -
लस घेतल्यानंतर किती दिवस मद्यपान करू नये यावर तज्ञांचे भिन्न मत आहे. गेल्या महिन्यात, रशियाच्या आरोग्य तज्ञांनी सांगितले की, लोकांनी Sputnik V Vaccine लस घेतल्यानंतर 2 आठवडे आधी आणि 6 आठवड्यांपर्यंत मद्यपान करू नये. कारण यामुळे विषाणूविरूद्ध लढा देण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
दरम्यान, अलेक्झांडर जिन्टबर्ग यांनी कोरोना लस घेतल्यानंतर तीन दिवस सावधगिरी बाळगण पुरेसे आहे. 'एका ग्लास शॅम्पेनमुळे कोणतीही हानी होत नाही, रोगप्रतिकारक यंत्रणेवरही त्याचा काहीही परिणाम होत नाही,' असंही म्हटलं होतं. तर दुसरीकडे, यूकेच्या आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, लस घेण्यापूर्वी एक दिवस आणि त्यानंतर एक दिवस मद्यपान करू नये. याशिवाय काही आरोग्य तज्ञांच्या मते, आपण जर संतुलित प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करत असाल, तर आपण कोरोना लस घेण्यापूर्वी तसेच त्यानंतर चिंता करण्याची गरज नाही. जर आपण जास्त मद्यपान करत असाल, तर तुम्हाला हे प्रमाण कमी करावे लागेल.