भारत बायोटेकने (Bharat Biotech) कोविड-19 (Covid-19) विरुद्ध विकसित केलेल्या कोवॅक्सिन (Covaxin) लसीचे दुष्परिणाम झाल्यास त्यांना नुकसान भरपाई (Compensation) देण्यात येईल, असे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. न्यूज 18 ने दिलेल्या रिपोर्टनुसार, कोवॅक्सिन लसीच्या Consent Form मध्ये नुकसान भरपाईचा पॉईंट हायलाईट केला होता. हे Consent Form सर्व लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी पाठवण्यात आले होते. यात असे नमूद केले आहे की, एखाद्या व्यक्तीवर लसीचा दुष्परिणाम झाल्यास ठरवलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचारही होतील.
कोवॅक्सिन घेणाऱ्या सर्व व्यक्तींना Consent Form भरणे अनिवार्य आहे. कोविशिल्ड लस ही केवळ आपात्कालीन वापरासाठी वापरली जाणार असल्यामुळे त्यासाठी कोणत्याही Consent Form ची आवश्यकता नाही. कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स अद्याप पूर्ण झालेल्या नसल्यामुळे बहुतांश लोकांनी त्याबद्दल सवाल उपस्थित केले होते. दरम्यान, या माहितीनंतर अनेकांना दिलासा मिळाला असेल.
मुंबईतील 6 सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सिनची लस दिली जाणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हरियाणामध्ये कोवॅक्सिन दिल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून Consent Form भरुन घेतला जाणार आहे. (COVID-19 Vaccine Fake Calls: कोविड-19 लसीकरण नोंदणीवर सायबर हल्लेखोरांचे सावट, नागरिकांना सतर्क राहण्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांचे आवाहन)
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने बनवलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन लसीला आपात्कालीन वापरासाठी DGCI कडून परवानगी मिळाली होती. कोविड-19 लस सर्वप्रथम एक कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसंच 50 वर्षांवरील आजार असलेले 27 कोटी प्रौढांना देण्यात येणार आहे. (COVID-19 Vaccination in India: केवळ आरोग्यसेवक आणि कोरोना योद्धांनाच मिळणार मोफत लस; डॉ. हर्षवर्धन यांचं स्पष्टीकरण)
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. तसंच मुंबईतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ झाला.