गेल्या वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेली कोविड लस (COVID-19 Vaccine) अखेर भारतात दाखल झाली असून आजपासून महाराष्ट्रातही कोविड लस देण्याची मोहिम सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोविड लसीकरणाचे उद्घाटन करुन ही मोहिम सुरु झाली आहे. या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा-यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासंदर्भात ज्यांना जिल्हा प्रशासनाकडून मेसेज मिळाला आहे त्याच लोकांना ही लस देण्यात येत आहे. मात्र तरीही नोंदणीसाठी खोटे फोन करुन सायबर हल्लेखोरांचा (Cyber Crime) ओटीपी, आधारकार्ड नंबर मागण्याचा गैरप्रकार देखील समोर येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क आवाहन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले आहे.
राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत असे अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.हेदेखील वाचा- CM Uddhav Thackeray Launches COVID-19 Vaccination Drive in Mumbai: मुंबईत कोविड-19 लसीकरणाला प्रारंभ; नियमांचे पालन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत. (१/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 16, 2021
त्याचबरोबर "अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सामायिक करू नये, असे मी आवाहन करतो.तसेच या फोन कॉल्सची नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी.जेणेकरून पोलीस या सायबर हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करतील" असे देखील अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरस लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेस राज्यात आजपासून (शनिवार, 16 जानेवारी 2021) सुरुवात (Corona Vaccination Begining in Maharashtra) होत आहे. या लसीकरणासाठी राज्यभरात सुमारे 285 केंद्रे उभारण्यात आली आहेत.