Union Health Minister Dr Harsh Vardhan (Photo Credits: PTI)

देशात सर्वांना कोरोना व्हायरस (Coronavirus) वरील लस (Vaccine) मोफत मिळणार असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांनी केलेल्या ट्विटमुळे मोफत लस मिळणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आज देशभरात कोविड-19 लसीच्या ड्राय रन्स (Covid-19 Vaccine Dry Run) सुरु आहेत. त्यावेळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशात कोरोनावरील लस मोफत मिळणार, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले होते. यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र कोविड-19 ची लस आरोग्य सेवक आणि कोरोना योद्धांनाच मोफत मिळणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमधून स्पष्ट झाले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "पहिल्या टप्प्यातील देशातील 1 कोटी आरोग्य सेवकांना आणि 2 कोटी कोरोना योद्धांना कोविड-19 वरील लस मोफत देण्यात येणार आहे. जुलैपर्यंत उर्वरीत 27 कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल." (COVID-19 Vaccination in India: कोविड 19 लस भारत भर मोफत उपलब्ध असणार; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)

Dr. Harsh Vardhan Tweet:

देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ड्राय रनची प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, लसीबद्दल पसरणाऱ्या अफवांच्या जाळ्यात न फसण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, सीरम इंस्टिट्यूडच्या कोविशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. मात्र अद्याप भारत बायोटेकची कोवॅक्सिनला मंजूरी मिळालेली नाही. लसींना मंजूरी मिळाल्यानंतर लवकरच देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल.