Dr Harsh Vardhan (Photo Credits: ANI)

भारतामध्ये पहिल्या कोविड 19 लसीला DGCI कडून मंजुरी मिळण्याआधी देशभर लसीची ड्राय रन घेतली जात आहे. 116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ही ड्राय रन घेतली गेली आहे. त्यापैकी दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी स्वतः जाऊन आढावा घेतला आहे. यावेळेस त्यांनी मीडीयाशी बोलताना दिल्ली सोबतच भारतभर कोविड 19 चे लसीकरण (COVID-19 Vaccination in India)  हे मोफत (Free Of Cost) उपलब्ध असेल अशी माहिती दिली आहे. दरम्यान ही मोफत लस पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी असेल. म्हणजेच 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी कोविड योद्धे यांच्यासाठी असेल. उर्वरित 27 कोटी Priority Beneficiaries साठी  लसीकरण मोफत असेल का? या बाबत अजूनही विचार सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज डॉ. हर्षवर्धन यांनी जातीने लसीकरणाच्या ड्राय रनच्या वेळेस माहिती कशाप्र्कारे फीड होतेय? लसी कशा ठेवल्या आहेत ? याची माहिती घेतली आहे. देशभरातून फीडबॅक देखील घेतला आहे. दरम्यान यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी कोविड 19 च्या लशीबद्दल नागरिकांनी अफवांना बळी पडू नका असं पुन्हा आवाहन केले आहे. पोलिओ लसीच्या वेळीदेखील अशाप्रकारे अफवा पसरवल्या जात होत्या मात्र नागरिकांनी उत्स्फुर्तपणे लसीकरणाला प्रतिसाद दिला आणि आज भारत पोलिओ मुक्त आहे. Oxford COVID-19 Vaccine Covishield: भारतीयांसाठी खुशखबर! सीरम संस्थेची लस 'कोव्हिशिल्ड'च्या आपत्कालीन वापरास मिळाली परवानगी- Reports.

केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन नुसार देशात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ड्राय रनची प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये काही राज्यांमधून फीडबॅक आले आहेत. CoWIN अ‍ॅपद्वारा लस देणार्‍यांना लसीबाबत माहिती दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर गंभीर परिणाम दिसल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एक विशेष कक्ष सज्ज ठेवला जाणार आहे. COVID-19 Vaccine Dry Run: राज्यासह देशभरात आजपासून कोविड-19 लसीची ड्राय रन.

अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन 

दरम्यान देशभर आज ड्राय रन सुरू असताना दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी ही लस मोफत दिल्लीवासियांना दिली जाणार असं म्हटलं होतं. तर आता नेमकी कधी लशीला अंतिम मान्यता मिळणार याची अनेकांना प्रतिक्षा आहे. एका लसीच्या डोसचा अंदाजे खर्च 220-250 आहे. या लसीचे 2 डोस दिले जाणार आहेत. पण आता सारा खर्च पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्र सरकार उचलणार आहे.

नुकतीच सीरम इन्सिट्युटच्या कोविशिल्डला तज्ञ समितीने मंजुरी दिली आहे. आता अंतिम मंजुरी DGCI देणार आहे. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस देखील मंजुरीच्या प्रतिक्षेमध्ये आहे. अजून काही माहितींची पुर्तता केल्यानंतर त्याला देखील तातडीच्या वापरासाठी मंजुरी मिळू शकते.