Summer Health Tips: खरबूज खाल्ल्याने उन्हाळ्यात 'या' आजारांपासून स्वत:ला दूर ठेवण्यास होईल मदत
MuskMelon (Photo Credits: Pixabay)

उन्हाळा हा फळांचा ऋतू असल्यामुळे आंब्यासह कलिंगड, मोसंबी, द्राक्षं, संत्री यासारखी अनेक फळांचा आस्वाद या मोसमात घेता येतो. उन्हाळ्यात उकाड्यामुळे तसेच तापमान वाढल्यामुळे या फळांचा शरीरावर दुष्परिणाम होत नाही उलटं उन्हाळ्यात ही फळे खाल्ल्याने शरीरास फायदेच जास्त होतात. असेच एक फळ उन्हाळ्यात खाणे अनेक लोक पसंत करतात किंबहुना उन्हाळ्यात हे फळं जास्त पाहायला मिळते ते म्हणजे 'खरबूज' (Muskmelon). खरबूज हे फळ बाहेरून दिसायला जितके छोटे आणि टणक वाटत असले तरी आतून मात्र रसाळ आणि चविष्ट असते. शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी आणि पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी खरबूजाचा उपयोग होते.

खरबूजमध्ये पाण्याशिवाय जीवनसत्त्वे आणि क्षाराचे प्रमाण 95% असते. ज्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त आकाराने छोटे दिसणारे फळ खाल्ल्यामुळे खालील आजार होत नाही. Summer Health Tips: उन्हाळ्यात चुकीच्या पद्धतीने काकडी चे सेवन केल्यास शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम

1. कर्करोगापासून बचाव

खरबूजमध्ये असलेले कॅरिटीनॉयड कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करते विशेषत: खरबुजातील बिया याबाबत खूपच फायदेशीर ठरल्या आहेत.

2. अपचन होत नाही

खरबूजमध्ये असलेले पाणी शरीरात अॅसिडिटी म्हणजेच अपचन होऊ देत नाही. खरबूजमधील क्षार चयापचय संस्था उत्तम राहते ज्यामुळे पचनसंस्था उत्तम राहते. कलिंगड खरेदी करताना त्याची निवड कशी कराल? जाणून घ्या 'या' खास टिप्स

3. रक्ताची गुठळी तयार होत नाही 

खरबूजमध्ये एंडीनोसीन नावाचे तत्त्व असते. जे शरीरात रक्ताची गुठळी वा डाग होऊ देत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?

4. किडनीच्या आरोग्यासाठी उपयोगी 

खरबुजाचे नियमित सेवन किडनी समस्येतील रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. विशेषकरून लिंबाच्या रसाबरोबर त्याचे सेवन युरिक अॅसिडशी संबंधित समस्या दूर करते.

5. त्वचेसाठी उत्तम

नितळ कांती (त्वचेसाठी)साठीही खरबूज उपयोगी आहे. खरबूजमध्ये कोलाजेन नावाचे तत्त्व मोठ्या प्रमाणात असते जे त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो.

त्यामुळे चवीला गोड असणारे हे फळ शरीरास खूपच पोषक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून आपल्या आहारात खरबूजाचा वापर करावा असा अनेक डॉक्टरांचा सल्ला असतो.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)