Cucumber (Photo Credits: Pixabay)

उन्हाळ्यात (Summer) गरमीने अंगाची लाही लाही होते आणि उकाड्याने घामाच्या घारा वाहू लागतात. अशा वेळी शरीरात गारवा निर्माण करतील अशी फळे, भाज्या खाणे आपण जास्त पसंत करतो. प्रवासादरम्यान अशा गोष्टी खाल्ल्यास थकवा कमी होती. काकडी ही अशीच शरीरात थंडावा निर्माण करणारी असल्यामुळे उन्हाळ्यास अनेकांना गारेगार काकडी खाण्यास फार आवडते. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीरास पोषक देखील असते. मात्र ही खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

काकडी विटामिन सी, विटामिन के, कॉपर, पोटेशियम, मैग्निशियम, मैगनीज आणि सगळ्यात महत्वाचे सिलिका सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. त्यामुळे अनेक जण आपल्या रोजच्या आहारात काकडीचा समावेश करतात मात्र काही त्याचे सेवन चुकीच्या पद्धतीने केल्यास तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम देखील होऊ शकतो.

  • रात्रीच्या वेळी कधीही काकडी खाऊ नये. काकडीमध्ये एक विषारी पदार्थ असतो ज्याला कुकबर्बिटाइन्स म्हटले जाते. आपण ज्या प्रमाणात काकडीचे सेवन करतात त्याच प्रमाणात हे विष आपल्या शरीरात जातं. यामुळे आपल्या यकृत, पॅन्क्रेटायटीस, पित्त मूत्राशय आणि किडनीसह इतर अनेक अवयवांना सूज येऊ शकते. Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी प्या 'ही' गुणकारी पेय
  • काकडी थंड असल्यामुळे ती प्रमाणात खावी अन्यथा सर्दी, खोकला सारखे आजार उद्भवू शकतात.
  • काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमचे पोट भरल्या सारखे वाटेल. काकडी हे फाइबरचा चांगला स्रोत आहे पण जास्त खाण्यामुळे तुम्हाला ढेकर येऊ शकतात आणि पोटात वेदना होऊ शकतात. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?

उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरास फायदेशीर आहे याबाबत दुमत नाही. फक्त ती खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ लक्षात ठेवल्यास नक्कीच त्यातील पोषकतत्त्वे तुमच्या शरीरास मिळतील.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)