Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी प्या 'ही' गुणकारी पेय
Summer Healthy Drinks (Photo Credits: pixabay and wikimedia)

अंगाची लाही लाही करणारा ऋतू म्हणजे उन्हाळा. उन्हाळा सुरु झाला की उकाड्याने आणि घामांच्या धारांनी माणूस अक्षरश: हैराण होतो. अशा परिस्थितीत लोकांना प्रचंड तहान लागते. घशाला सोक पडतो. यावेळी लोकांची पावले आपोआप शीतपेय म्हणजेच कोल्ड्रिंग्सकडे वळतात. मात्र कोल्ड्रिंग मुळे मिळणारा शरीराला मिळणारा गारवा हा काही क्षणांपुरता असून त्याचे दुष्परिणाम अधिक होतात. अशा वेळी कोल्ड्रिंग न पिता काही महत्त्वाची अशी शरीरास लाभदायक पेय पिणेही कधीही चांगले.

या पेयांमुळे न केवळ शरीराला गारवा मिळतो तर शरीरावर त्याचे चांगले परिणामही होतात. जाणून घेऊया अशा गुणकारी पेयांविषयी:

1. लिंबू सरबत

उन्हाळ्यात लिंबू सरबत प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?

2. शहाळ्याचे पाणी

शहाळ्याचे पाणी हे अगदी सलाईनसारखे काम करते. उन्हामुळे उलट्या किंवा जुलाब झाल्यावरही याचा चांगला उपयोग होतो.

3. उसाचा रस

उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते. Summer Tips: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे 10 गुणकारी फायदे

4. कोकम सरबत

कोकम हे पित्तनाशक असल्यामुळे उन्हाळ्यात कोकम सरबत प्ययल्याने पित्ताचा त्रास होत नाही. कोकम सरबत प्यायल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.

5. कैरीचे पन्हे

कैरीचे पन्हे शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तसेच उन्हाळ्यात कैरीचे पन्हं प्यायल्यास थकवा दूर होतो.

यासोबत द्राक्षं, कलिंगड, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांचा रस देखील उन्हाळ्यात शरीरास फायदेशीर ठरतो. म्हणून उन्हाळ्यात शीतपेय पिण्याऐवजी ही गुणकारी पेय पिणे कधीही चांगले.