उन्हाळा सुरु झाला की लोकांची पावलं वळतात ती चविष्ट, पौष्टिक फळांकडे. त्यात उन्हाळ्यात आंब्यासह आणखी एका फळाला जास्त मागणी असते ती कलिंगड. लालम लाल, पाणीदार, गोड चविष्ट कलिंगड (Watermelon) उन्हाळ्यात खाणे लोक अधिक पसंत करतात. मात्र अनेकदा लोकांसमोर समस्या असते ती कलिंगड निवडायचे कसे? ब-याचदा लोक आकारानुसार किंव रंगावरुन कलिंगड निवडतात. मात्र यावरुन कलिंगड आतून गोड असेल की नाही याची शाश्वती नसते. यामुळे अनेकदा आपली फसवणूक होऊ शकते. रसदार, आणि अवीट गोडीचे, शरीराला थंडावा देणारे असे हे फळ आहे.
कलिंगड खरेदी करताना ते कसे निवडावे यासाठी काही खास टिप्स:
1. कलिंगड निवडताना त्याचा बाहेरील काही भाग पिवळट केसरी दिसला तर समजा ते कलिंगड पिकून तयार झालेले आहे.
2. जर त्याचा रंग फिकट पिवळा असेल तर हे कलिंगड थोडे पिकणे बाकी आहे.
3. तसेच हा भाग पांढरा असेल तर कलिंगड तयार नाही असे समजा.
4. कलिंगड निवडताना ते जास्त मोठे किंवा अगदी लहान निवडू नये. तर ते मध्यम आकाराचे निवडावे. Health Tips: Quarantine च्या काळात 'अशा' पौष्टिक पदार्थांचा तुमच्या आहारात असावा समावेश, WHO ने केले मार्गदर्शन
5. कलिंगडाचे देठ पूर्ण वाळलेले असेल तर ते कलिंगड खाण्यास तयार असल्याचे ओळखावे.
6. जर कलिंगडाचे देठ हिरवे असेल, तर हे कलिंगड पिकण्याआधीच तोडले गेले आहे असे समजावे. एकदा वेलीवरून तोडलेले कलिंगड पिकत नाही.
या गोष्टी लक्षात ठेवल्यास कलिंगड निवडताना तुम्हाला मदत होई शकते. हे उपाय ट्राय करुन छान चवदार कलिंगड खरेदी करुन उन्हाळ्यात मस्त कलिंगडावर ताव मारा.