Fruits (Photo Credits: Facebook)

कोविड-19 (COVID-19) च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत काहीही काम न करता घरात राहिलेल्या अनेकांना सुस्तपणा आल्याचे ऐकण्यात येत आहे. तर काही जण घरात छान चमचमीत पदार्थ करून लॉकडाऊन मस्त एन्जॉय करत आहेत. मात्र अशा पद्धतीने एन्जॉय करण्यालाही काही बंधन असावीत. कारण लॉकडाऊन त्वरित डॉक्टर उपलब्ध होणे शक्य नाही. त्यात कोरोना रुग्ण हाताळणा-या डॉक्टरांचा त्रास वाढवता कामा नये ही गोष्ट लक्षात प्रत्येक नागरिकाने आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही Quarantine काळात ठराविक पद्धतीचा आहार घेणे गरजेचे आहे असे WHO या संस्थेवर कडून सांगण्यात येत आहे.

घरी असल्यामुळे आपल्या जिभेवर ताबा न राहणे हे स्वाभाविक आहे. मात्र हे खाताना तुम्ही काही ठराविक पदार्थ खाणे वर्ज्य केले पाहिजे, असा सल्ला WHO ने दिला आहे.

पाहा WHO ने केलेले मार्गदर्शन:

1. क्वारंटाईनमध्ये असताना पॅकेटबंद, डब्बाबंद पदार्थ, मीठ आणि साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. घरात तयार केलेले ताजे अन्नाचे सेवन करावे. Coronavirus चा सामना करण्यासाठी वाढवा रोगप्रतिकार शक्ती; ऋजुता दिवेकरने दिला आठवड्याचा डाएट प्लॅन व काही टिप्स

2. तेलकट, तुपकट पदार्थ कमी प्रमाणात खावे ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढणार नाही.

3. आहारात फळे, भाज्यांचा समावेश जास्त असावा.

4. चहा-कॉफीचे प्रमाणात सेवन करा अन्यथा पोटाचे विकार होऊ शकतात.

5. आहारात ओट्स, ब्राऊन पास्ता, ब्राऊन राईस, क्विनोआ, ब्राऊन ब्रेड इत्यादींचा समावेश असावा.

6. जेवणानंतर बडीशेप घ्या अन्नाचे पचन चांगले होते. Weight Loss Natural Tips: लॉक डाऊन मुळे घरबसल्या वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचा चहा ठरेल बेस्ट; जाणून घ्या फायदे आणि झटपट रेसिपी

7. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात कमीतकमी ८-९ ग्लास पाणी प्यावं. तसेच, शक्य असल्यास एक ग्लास लिंबूपाणी, एक ग्लास ज्यूस किंवा एक ग्लास दूध प्यावं.

8. काकडी, गाजर, पेपरमिंट, लॅव्हेंडर, रोझमेरी आणि बेरी जेवणाबरोबर खावं.

Quarantine काळात आहारात मांस, लोणी, नारळाच्या तेलाचे सेवण कमी करुन व्हिटॅमिन सी आणि डी फळांचा समावेश करा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया योग्य रित्या होईल आणि रोगप्रतिकार शक्ती वाढेल.