सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) दहशत माजवली आहे. अशात उपाययोजना म्हणून भारतात 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आता लोकांना घरी राहूनच स्वतःची काळजी घ्यायची आहे. या रोगावर आपल्याला विजय मिळवायचा असेल, तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. यासाठी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. सोबतच दिवेकर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर या 21 दिवसांसाठी संपूर्ण आठवड्याचा डाएट प्लानही (Diet Plan) दिला आहे. सध्याच्या काळात आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जास्तीत जास्त घरचे अन्न घ्यावे असे ऋजुता दिवेकर यांचे म्हणणे आहे.
ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात बनवलेल्या भाज्या, डाळी, लोणचे, चटण्या अशा अनेक गोष्टींनी तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता. ऋजुता यांनी पोस्ट केलेला प्लान हा मुख्यत्वे धान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी अशा गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन बनवला आहे. यामध्ये पूर्णपणे घरात उपलब्ध होणात्या गोष्टींचा समावेश आहे.
ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेला डाएट प्लान –
सध्याच्या काळात तरुणाई जास्तीत जास्त सोशल मिडियावर आपला वेळ व्यतीत करते, मात्र तसे न करता या काळात झोप अतिशय महत्वाची असल्याचे दिवेकर यांनी सांगितले. यामुळे आपले जीवन तणावमुक्त राहण्यास मदत मिळते. तसेच सूर्यनमस्कार, अय्यंगर योगा, सतत पाणी पीत राहणे, घरातच हालचाल करत राहणे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळेही आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Health Benefits: हाडांची मजबुती ते उजळ त्वचा मिळवण्यासाठी बेस्ट आहे मसूर डाळ; जाणून घ्या फायदे)
दरम्यान, आज महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहचली आहे. सध्याच्या कठीण काळात सरकारने लोकांना जासित जास्त घरी राहण्याचे आवाहन केले आहे.