Hair Removal Tips: Waxing ऐवजी Shaving चा पर्याय वापरत असाल तर या गोष्टी ठेवा लक्षात; शरीरावर जाड केस येणं होईल नाहीसे
Hair Removal shaving Tips (Photo Credits: Unspalsh, Pixabay)

आता लवकरच उन्हाळा सीझन सुरु होईल, समर वाइब्स (Summer Vibes) नुसार आपणही शॉर्ट्स, क्युट ड्रेसेस घालून बाहेर पडण्याच्या विचारात असाल, अशावेळी पायावर जाड केस असले तर असे कपडे कसे घालू असा प्रश्नही तुम्हाला साहजिक पडेलच. मग अगदी आयत्या वेळी पार्लरमध्ये जाण्याऐवजी आपण घरीच रेझर घेऊन शेव्हिंग (Shaving) चा पर्याय निवडाल, वास्तविक यात काही हरकत नाही मात्र अनेकदा शेव्हिंग मुळे पुन्हा अंगावर येणारे केस हे नियमित लवेपेक्षा जाडसर येतात. आणि पुढच्या वेळी हेच केस पुन्हा काढून टाकताना त्वचेला त्रास होतो. असं होऊ द्यायच नसल्यास तुम्हाला शेव्हिंग वेळी फक्त काही सोप्प्या टिप्स लक्षात ठेवण्याची गरज आहे. अनेक महिलांना वॅक्सिंग (Waxing)  मुळे त्रास होतो तर हेअर रिमूव्हल क्रीम्स (Hair Removal Creams)  मुळे त्वचा काळवंडते असाही काहींचा अनुभव असतो, यावर पर्याय म्ह्णून रेझरचा वापर हा त्यातल्या त्यात सेफ म्हणता येईल. फक्त रेझर योग्य पद्धतीने वापरला जातोय का या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही योग्य पद्धत कोणती आणि शेव्हिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावयाच्या हे जाणून घ्या..

कसा वापराल रेझर?

रेझर फिरवताना ज्या दिशेने केस येतात त्या दिशेनेच फिरवा यामुळे केस मुळासकट निघून जायला मदत होते आणि पुढील वेळेस जाड केस येत नाहीत. रेझर फिरवताना दुखापत होईल इतका जोर लावू नका.हात, पाय, अंडरआर्म्स, गुप्तांग अशा सर्वच ठिकाणी एकच रेझर वापरू नका.ब्लेड चेंज करणारे रेझर वापरत असाल तर एखादे ब्लेड तीन ते जास्तीत जास्त चारवेळा वापरा त्यावर नको. Razor Burn पासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा

शेव्हिंग प्रोसेस सोप्पी करतील असे मार्ग

- जो भाग शेव्ह करायचा आहे तो पाण्याने भिजवा यामुळे केस नरम होतील.

-हात किंवा पाय, अंडरआर्म्स , प्रायव्हेट पार्ट वरील केस काढायचे असतील तरी आधी त्यावर कमी केमिकल्स असलेले शेव्हिंग फोम वापरा मगच केसांना रेझरचा वापर करा.यामुळे केस नरम होतात आणि पटकन निघून जातात.

- शेव्हिंग केल्यानंतर तुमच्या त्वचेची छिद्र उघडतात. त्यात धूळ जाऊ नये किंवा कोरडेपणा येऊ नये, रेडनेसचा त्रास होऊ नये म्हणून चांगले मॉश्चरायझर त्वचेला लावा.(How To Lighten Underarms: अंडरआर्म्स काळे पडले असतील तर घरीच करा 'हे' सोप्पे उपाय; काहीच दिवसात दिसेल रिझल्ट)

-शेव्ह केल्यानंतर आधी तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सला अॅलोवेरा जेल किंवा बर्फ लावा. बेबी पावडर ने जळजळ होत असल्यास लगेच थांबते.

(टीप: वरील लेखात दिलेल्या टिप्स या माहितीच्या आधारे लिहिलेल्या आहेत, यास वैद्यकीय सल्ला समजू नये, त्वचेला त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरर घ्या)