How To Lighten Underarms: अंडरआर्म्स काळे पडले असतील तर घरीच करा 'हे' सोप्पे उपाय; काहीच दिवसात दिसेल रिझल्ट
How To Lighten Underarms (Photo Credits: Instagram)

फॅशनच्या दुनियेत कपडे कोणत्या ब्रँडचे आहेत यापेक्षा देखील ते कसे कॅरी केले जातात हे आधी पाहिले जाते. एखाद्या व्यक्तीने फार फॅन्सी कपडे घातले असतील मात्र शरीराची स्वच्छता अगदीच दुर्लक्षित केली असेल आणि त्यामुळे कुठे काळे डाग, मृत त्वचा, दिसून येत असतील तर स्टायलिश पेक्षा फॅशन डिझाझस्टर म्ह्णून त्या व्यक्तीकडे बघितले जाऊ शकते. आता स्वच्छतेचा विषय निघताच क्लिअर अंडरआर्म्स असणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. बरोबर ना? अनेकजण तर बाजारातील सर्व प्रोडक्ट वापरून हे क्लिअर अंडरआर्म्स (Clear Underarms) मिळवण्याचे प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा केमिकल युक्त प्रोडक्ट्सने तुम्हाला अगदी काही वेळचा दिलासा मिळू शकतो, पण जर का तुम्हाला एक कायम स्वरूपी सोल्युशन हवे असेल तर त्यासाठी थोडा वेळ काढून आपल्या शरीराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

क्लिअर अंडरआर्म्स मिळवण्यासाठी काय करावे या अनेकांना भेसडासावणाऱ्या प्रश्नाचे अगदी सोप्पे आणि घरगुती उत्तर आज आम्ही सांगणार आहोत. चला तर मग पाहूयात घरच्या घरी कसे मिळवायचे क्लिअर अंडरआर्म्स ?

कॉफी स्क्रब

जाड दळलेली कॉफी घेऊन त्यात थोडी कोरफड घालून घट्ट पॅक तयार करा आणि अंडरआर्म्सना लावा. आणि त्यांनतर 1 ते 2  मिनिट वाळल्यावर थंड पाण्याने धुवून टाका.

संत्र्याची साल

संत्र्याची साल त्वचेचे रंग हलके करण्यात फायदेशीर ठरते. ही साल काही दिवस वाळवून त्याची बारीक पावडर करा. या मध्ये काही चमचे गुलाब पाणी किंवा दुध घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर 10 ते 15 मिनिट लावून ठेवा नंतर धुऊन टाका.

बटाटा

नैसर्गिक ऑक्सिडन्स्टस ने युक्त बटाटा हा काळे डाग घालवण्यासाठी अगदी गुणकारी उपाय आहे. बटाट्याचा पातळ काप अंडरआर्म्सवर चोळा . किंवा रस काढून काळ्या भागेवर लावून 15 ते 20 मिनिट राहू द्या.

ओट्स

ओट्स मध्ये तुम्हाला कोरफड गर आणि थोडीशी हळद घालून तुम्ही पॅक बनवू शकता. केवळ काळे डागच नव्हे तर तुमची त्वचा अगदी मुलायम बनवण्यास देखील हा पॅक खास उपयुक्त आहे.

Skin Care For Winter: त्वचेचा रुक्षपणा ते पिंपल्स सहित 'या' समस्यांवर उपाय आहे मसूर डाळ; घरीच बनवा फेसपॅक

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा घेऊन त्यात अगदी दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घालून ती पेस्ट अंडरआर्म्सला लावा. दोन ते तीन मिनिटे लावून अंडरआर्म्स नीट वाळू द्या व मग थंड पाण्याने धुवून टाका.

मध + साखर

नेहमीपेक्षा थोडीशी जाडसर आकाराची साखर घेऊन त्यात थोडे मध मिसळून हे मिश्रण तुम्हाला अंडरआर्म्सवर एक मिनिट चोळा. कोमट पाण्याने अंडरआर्म्स धुवून तेथील त्वचा कोरडी करुन घ्या.

अशीही घ्या काळजी

- अंडरआर्म्सची दुर्गंधी घालवण्यासाठी डिओ निवडताना लक्ष द्या, केमिकलचे पप्रमाण नीट तपासून घ्या, तसेच नुकतेच वॅक्सिन्ग किंवा शेविंग केले असेल तर लगेच डिओ वापरू नका.

- रेझरचा वापर कमी करा, यामुळे केस ताठ होतात आणि त्यांची वाढ देखील अधिक जलद होते.

- घट्ट कपडे वापरणे टाळा. यामध्ये अंडरआर्म्सची त्वचा अगदी गुदमरून जाते तसेच परिणामी मृत आणि काळी पडते.

अलीकडे पार्टी म्हणा किंवा रेग्युलर वापरात स्लिव्हलेस कपडे आवर्जून वापरले जातात, मात्र अशा वेळी काळे अंडरआर्म्स चारचौघात आपल्याला मान खाली घालायला लावू शकतात हे टाळण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करून पहा.