Skin Care For Winter: त्वचेचा रुक्षपणा ते पिंपल्स सहित 'या' समस्यांवर उपाय आहे मसूर डाळ; घरीच बनवा फेसपॅक
Masoor Dal Facepack (Photo Credits: Instagram)

Winters 2019: अनेक ठिकाणी आता थंडीचा जोर दिसू लागला आहे, पण या गुलाबी थंडीची गंमत वाटण्याऐवजी तुम्हालाही त्वचेच्या त्रासाची (Skin Care) भीती जास्त सतावतेय का?. थंडीतील कोरड्या हवेमुळे अनेकदा चेहरा पार सुकून जातो, त्वचेवर काळे डाग पडणे (Pigmentation) , स्किन खरखरीत होणे (Dry Skin) हे त्रास लगेचच जाणवू लागतात. यावर उपाय म्ह्णून काही जण बाजारातील फेसवॉश, स्क्रब, फेसपॅक वापरू लागतात. पण अनेकदा हे केमिकलयुक्त पदार्थ आपल्या त्वचेला फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानच करून जातात. यावर उपाय म्हणजे काय तर नैसर्गिक उत्पादन वापरा. पण तुम्ही जर का ब्युटी प्रोडक्ट्सची माहिती ठेवत असाल तर तुम्हाला हे हि ठाऊकच असेल की हे नैसर्गिक नावावर विकले जाणारे पदार्थ तुमच्या खिशाला चांगलेच भगदाड पाडू शकतात. खर्च आणि काळजी या चिंतेत अडकला असाल तर यावर उपाय म्हणजे घरगुती उपचार. आज आम्ही देखील आपल्याला थंडीत तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी याचा एक नामी होम मेड उपाय सांगणार आहोत. तुमच्या किचन मध्ये नेहमीच दिसून येणारी मसूर डाळ आणि तिचे त्वचेसाठीचे फायदे ऐकून कदाचित तुम्हालाही विश्वास बसणार नाही..

चला तर मग पाहुयात.. त्वचेसाठी कशी उपयुक्त आहे मसूर डाळ

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी उपयुक्त

अनेकदा थंडीत चेहरा काळवंडला जातो, अशा वेळी मसूरच्या डाळीचे स्क्रब तुम्हाला उपयोगी ठरेल. डाळीची जाडसर पावडर करून अगदी कमी पाण्यात भिजवून चेहऱ्यावर हलका मसाज केल्यास चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते त्यामुळे चेहऱ्याचा रंग देखील उजळतो. या पॅकमध्ये किंचित बेसन पीठ व दही देखील ऍड करू शकता.

हे ही वाचा-  त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतो मुळा, जाणून घ्या फायदे

तेलकट त्वचेवर नामी उपाय

तेलकट त्वचेवर उपाय म्ह्णून मसुराची डाळ वापरू शकता. यासाठी रात्रभर मसुरची सोललेली डाळ भिजत घालून सकाळी ती वाटून घ्यावी यात किंचित गुलाबपाणी घालून हलक्या हाताने चेहऱ्याला लावावी. यावेळी वरच्या बाजूने मसाज करत चेहऱ्याच्या तेलकट भागांवर हापॅक नीट चोळून घ्यावा. यामुळे तेलकट पणा कमी होऊन चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होते.

त्वचेचा रुक्षपणा घालवा

मसूरची डाळ जितकी तेलकटपणा घालवू शकते तितकीच योग्य प्रमाणात चेहऱ्याला मॉइस्चराइज देखील करू शकते. यासाठी या फेसपॅकमध्ये १ चमचा शुद्ध मध टाकल्यास त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

पिंपल्स ला करा बाय बाय

मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजवून त्यात किंचित ग्लिसरीन, बदाम तेल, गुलाबपाणी घालून वाटून घेत चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून थोडी सुकू द्या व यांनतर थंड पाण्याने धुवून टाका. पिंपल्स घालवण्यासाठी हा उत्तम उपाय ठरतो.

चेहऱ्यावरील नकोसे केस काढून टाकते

चेहऱ्याचे वॅक्स करणे किंवा थ्रेडींग करणे अनेकदा वेदनादायी ठरू शकते यावर उपाय म्हणजे मसूरच्या डाळीचा फेसपॅक,जाडसर मसूर पावडर व त्यामध्ये थोडी चंदन पावडर ऍड करून हा पॅक बनवू शकता. हा एक उत्तम स्क्रब असल्याने अधिक वेदना न देता अगदी काहीच वेळात केस निघून जाण्यास मदत होते. हे मिश्रण लावताना तुमच्या डोक्यावरील व भुवयांवरील केस नीट कव्हर करा.

कान साफ करण्याचे '5' घरगुती उपाय Watch Video

(टीप- हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, याला वैद्यकीय सल्ला समजू नये)