आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराबरोबरच मानसिक आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत. ताणतणाव तर जीवनाचा एक भागच झाला आहे. पण त्याचा गंभीर परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी शारीरिकरित्या अॅक्टीव्ह असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी संतुलित, सात्विक आहाराची नितांत आवश्यकता आहे. आरोग्यासाठी पालेभाज्या उपयुक्त ठरतात असे मानले जाते. तसेच आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा असे डॉक्टरांकडून सुद्धा वारंवार सांगितले जाते. पालेभाज्यांमध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, अॅंटीऑक्सीडेंट आणि ल्युटीन असते. या सर्व पोषकघटकांमुळे स्वस्थ राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात पालेभाज्या आणि हंगामी भाज्यांचा जरुर समावेश करा.
तर पालेभाज्यांमधील मुळा हा खासकरुन बहुतांश लोक भाजी म्हणून न वापरता सलाडच्या स्वरुपात खाणे पसंद करतात. मुळा हा आरोग्यासाठी लाभदायक असून त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मुळा हा फक्त आरोग्यवर्धकच नव्हे तर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा गुणकारी ठरतो. कारण मुळ्यामध्ये अत्यावश्यक पोषक तत्व असुन ते सौंदर्य खुलवण्यासाठी सुद्धा मदत करतो. तर जाणून घ्या कशा प्रकारे मुळा त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतो.(मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आहारात या '९' पदार्थांचा समावेश करा !)
-मुळ्याचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास त्वचा आणि केसांसाठी पोशक ठरते. तसेच सौंदर्यासंबंधित विविध समस्या सुद्धा मुळा खाल्ल्याने दूर होतात.
-विटामिन ए आणि सी मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असातात. त्यामुळे मृत त्वचा जीवंत करण्यास मदत करतात.
-मुळ्यात कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस सारखी खनिजे, प्रोटीन आणि फायबर असतात. हे सर्व पोषक तत्व केस आणि त्वेचेसाठी फार गुणकारी ठरतात.
मुळ्याचे अन्य काही फायदे असून तो त्वचेला हायड्रेड ठेवण्यास मदत करतो. त्याचसोबत मुळ्याच्या सेवनाने विविध प्रकारच्या विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. एवढेच नाही तर केसांसंबधित काही समस्या असल्यास त्या सुद्धा कमी होतात. खासकरुन केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते.