आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराबरोबरच मानसिक आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत. ताणतणाव तर जीवनाचा एक भागच झाला आहे. पण त्याचा गंभीर परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी शारीरिकरित्या अॅक्टीव्ह असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी संतुलित, सात्विक आहाराची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आहारात या काही पदार्थांचा समावेश करा...
पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, अॅंटीऑक्सीडेंट आणि ल्युटीन असते. या सर्व पोषकघटकांमुळे स्वस्थ राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात पालेभाज्या आणि हंगामी भाज्यांचा जरुर समावेश करा.
सुकामेवा
प्रोटीन्स, मिनरल्स आणि कॅल्शियमने भरपूर अशा सुक्यामेव्याचे सेवन अवश्य करा. बदामात ट्रायपोफान नावाचे तत्त्व असते त्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर अक्रोड, काजू आणि इतर सुक्यामेव्याच्या पदार्थांचा समावेश करा.
अंजीर
अॅंटीऑक्सीडेंटने भरपूर अंजीरमध्ये 80% पाणी, 0.06% कॅल्शियम, 63% कार्बोहायड्रेट, 2.3% फायबर्स, 0.2% फॅट्स, 3.5% प्रोटीन, क्षार 0.7%, सोडिअम, पोटॅशियम, तांबे, सल्फर आणि क्लोरीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे बळकट होतात. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य जपण्यासही मदत होते.
सलाड
जेवणासोबत किंवा जेवणापूर्वी सलाड जरुर खा. त्यामुळे अधिक खाणे टाळता येईल. परिणामी वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल. सलाडमध्ये काकडी, टॉमेटो, गाजर यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
बेरीज
अॅंटीऑक्सीडेंटयुक्त ब्लुबेरी मूड बुस्टर फूड आहे. ताणात असाल तर ब्लुबेरी खा. त्यामुळे ताण झटपट दूर होईल. याशिवाय ओमेगा-३ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुळस
अॅंटी इंफ्लेमेंटरी गुणांनी भरपूर तुळस खाणे महिलांसाठी अधिक फायदेशीर आहे. तुळसीचा चहा किंवा दुधात तुळस घालून घ्या.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट खाल्याने ताण हलका होतो. यात अँटीऑक्सीडेंट असल्याने आरोग्यास फायदा होतो.
हळद
हळद इम्युनिटी बूस्टर आहे. यात अॅंटीसेप्टीक आणि अॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म असल्याने मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासूनही दूर राहण्यास मदत होते.
बीट
विशेषतः महिलांमध्ये अॅनेमियाची समस्या अधिक असते. बीटात आयर्न भरपूर प्रमाणात असते. बीटाच्या सेवनामुळे मासिक पाळीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहते.