प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

रेजर्स बर्न म्हणजे अंगावरील केस रेझरच्या माध्यमातून काढल्यानंतर त्वचा लाल होणे. बर्न झाल्यावर त्वचेवक डार्क लाल रंगाचे ठसे येण्यास आणि त्वचेची जळजळ होण्यास सुरुवात होते. रेझर बर्न लवकर बरे सुद्धा होत नाही. पण त्वचा पूर्ववत होण्याासाठी कमीत कमी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अशा स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा लक्षात ठेवाव्यात.

अंगावरील केस काढणे किंवा पुरुषांनी दाढी केल्यावर त्वचा लाल झाल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा खाज सुद्धा येण्यास सुरुवात होऊन बारीक पुटकुळ्या येतात. या समस्येपासून बचाव करण्यासाठी केस काढण्याची योग्य पद्धत वापरणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत बाजारात विविध कंपनीचे Hair Remover उपलब्ध आहेत. पण जर तुम्ही रेझरने केस काढत असल्यास या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करु नका.(How To Lighten Underarms: अंडरआर्म्स काळे पडले असतील तर घरीच करा 'हे' सोप्पे उपाय; काहीच दिवसात दिसेल रिझल्ट)

-रेझरने केस काढताना एक उत्तम कंपनीची आणि पद्धतीची शेविंग क्रिम किंवा फोमचा वापर करावा, जेणेकरुन त्वचेसंबंधित अन्य समस्या उद्भवू नये याची काळजी जरुर घ्या.

-असे मानले जाते की, विरुद्ध दिशेने केस काढल्यास त्वचा मऊ होते. मात्र रेझर बर्नची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शेविंग करताना केस ज्या दिशेने आहेत त्या दिशेने करावे. तसेच रेझर एकाच ठिकाणी दोन-तीन वेळेस वापरु नये.

-केस काढताना रेझर वरील ब्लेडच्या पाती धारदार असाव्यात. कारण धारधार नसल्यास केस काढताना त्यावर अधिक जोर लावून केस काढावे लागतात. यामुळे स्किन बर्नसह तुम्हाला जखम होण्याची शक्यता अधिक असते.

तर केस काढल्यानंतर सुद्धा शेविंग क्रिम किंवा डीप मॉइस्चराइजिंग क्रिम जरुर लावावी. त्यामुळे त्वचा मऊ होईल आणि रेझर बर्न पासून बचाव होईल. तर वरील काही टिप्स लक्षात घेऊन रेझर बर्न होण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.