yoga Pic (Photo Credits: PixaBay)

रोगाला स्वत:पासून दूर ठेवायचे असेल तर योगा (Yoga) हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे. योगा हा केवळ शारीरिक स्वास्थ जपण्यासाठी नाही मानसिक स्वास्थ जपण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. येत्या 21 जूनला संपूर्ण जगभरात जागतिक योगा दिवस साजरा केला जाईल. 21 जून 2015 पासून पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून हा दिन दरवर्षी साजरा केला जातो. यंदा लॉकडाऊन मुळे लोकांनी घरात राहून आपल्या कुटूंबियांसोबत योगा करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. म्हणून या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगा दरम्यान का काळजी घ्यावी हे सर्वांनी लक्षात घेणे जरूरीचे आहे.

कोणी मानसिक स्वास्थ्यासाठी तर कोणी शारीरिर स्वास्थ्यासाठी योगा करण्यावर भर देतो. योगाचा फायदा आपल्या शरीराला नक्की फायदा होतो मात्र त्यात एकाग्रता आणि नित्य नियमितपण गरजेचा आहे. तसेच योगा दरम्यान किंवा योगा करण्यापूर्वी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे जरूरीचे आहे.

1. भरल्या पोटी योगा करू नये

योगा करतेवळी तुमचे पोट हे रिकामी असले पाहिजे. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही योगा करण्याचा विचार करत असाल, तर योगा करण्यापूर्वी 3 तास आधी काहीही खाऊ वा जेवू नये. शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी योगा करणे सर्वात चांगले.

हेदेखील वाचा- International Day of Yoga 2020: लहान मुलांसाठी योगसाधनेचे महत्त्व काय? योगसाधनेला सुरुवात करण्यासाठी उपयुक्त टिप्स

2. एकाग्रता

योगा करताना संपूर्ण लक्ष हे योगसाधेवर असावे. मोबाईल, टीव्ही यांसारखी यांत्रिक उपकरणे यावेळी बंद ठेवावी वा त्यापासून दूर असावे.

3. योगा करतेवेळी पाणी पिऊ नये

जर तुम्ही योगा करत असाल तर त्या दरम्यान अजिबात पाणी पिऊ नका. कारण योगामुळे शरीरामध्ये हिट निर्माण होते. त्यात जर तुम्ही पाणी प्यायलात तर तुम्हाला एलर्जी, सदी-खोकला आणि कफ होऊ शकतो.

4. मूत्र विसर्जन टाळा

योग दरम्यान मूत्र विसर्जन टाळावे कारण यात शरीराचं पाणी घामाद्वारे बाहेर पडणे अधिक गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Lockdown मुळे यंदा जागतिक योग दिनानिमित्त ठेवली 'ही' खास थीम

5. योगा केल्यानंतर त्वरित स्नान करु नये

सकाळच्या वेळी योगा करणे खूपच फायद्याचे मानले जाते. मात्र योगा केल्यानंतर त्वरित आंघोळ न करता एक तासानंतर आंघोळ करावी.

6. आजारी असाल तर योगा करू नये

आजारपाणात तुम्ही योगक्रिया करु नका कारण त्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. जर तुम्ही आजारपणातही योग करु इच्छिता तर डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला द्या.

7. महिलांनी/मुलींनी मासिक पाळी दरम्यान योगा करणे टाळा

योगा करताना पोटावर ताण पडतो ज्यामुळे महिलांना मासिक पाळी दरम्यान त्रास होऊ शकतो वा रक्तस्त्राव होऊ शकतो. म्हणून मासिक पाळी दरम्यान योगा करणे टाळा.

8. स्वच्छ ठिकाणी योगा करणे

योगा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटक्या ठिकाणी केला पाहिजे. कारण ताज्या आणि मोकळ्या हवेत योगा करणे फायद्याचे समजले जाते.

9. चुकीची आसने करण्यापासून सावध रहा

योग्य योगा करण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. चुकीची आसने केल्याने शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्याने तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्या अद्भवू शकतात.

10. स्वच्छ ठिकाणी योगा करणे

योगा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटक्या ठिकाणी केला पाहिजे. कारण ताज्या आणि मोकळ्या हवेत योगा करणे फायद्याचे समजले जाते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग करण्यासाठी आधी शरीराची सकारात्मक भूमिका असली पाहिजे. त्यासाठी योग करण्याआधी थोडा वॉर्मअप करा, प्राणायाम करा आणि त्यानंतर योगाला सुरुवात करा आणि शेवटी शवासन करा.